esakal | West Bengal Election 2021: ममता-मोदींच्या 'फाइट'वर भन्नाट मीम्स व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Memes

West Bengal Election 2021: ममता-मोदींच्या 'फाइट'वर भन्नाट मीम्स व्हायरल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

चार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. यामध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय झाला. एकीकडे ममता यांचा सलग तिसऱ्यांदा विजय झाला तर दक्षिणेकडील राज्यांनी भाजपला दूर ठेवलं. यावरून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात मीम्सचा पाऊस पडला.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने २१३ जागांवर विजय मिळवला असून भाजपने ७७ जागांवर विजय मिळवला आहे. यावरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. त्यातच अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनाही ट्रोल केलं जातंय.

मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, मी एक नंबरचा कोब्रा आहे असं विधान केलं होतं. त्यांचं हे विधान खूप गाजलं होतं. त्यावरून आता मिथुनदा यांना ट्रोल केलं जातंय.

पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका आणि देशातील पोटनिवडणुकांची मतमोजणी रविवारी झाली. चित्रपट अभिनेते कमल हासन यांनी मक्कल निधी मयम हा पक्ष स्थापन करून राजकीय वातावरण तापवलं होतं. पण त्यांचाही निसटता पराभव झाला.

loading image