गंगासागर महोत्सवाला न्यायालयाची परवानगी | Gangasagar Festival | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gangasagar Festival
गंगासागर महोत्सवाला न्यायालयाची परवानगी

गंगासागर महोत्सवाला न्यायालयाची परवानगी

कोलकता : जगप्रसिद्ध गंगासागर महोत्सवाला (Gangasagar Festival) कलकत्ता उच्च न्यायालयाने (Kolkata High Court) परवानगी दिली. कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक ती उपाययोजना करून हा महोत्सव भरविण्याचा निर्णय पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने घेतला. त्यानंतर न्यायालयाने विशिष्ट अटींवर हिरवा कंदील दर्शविला. सरकारने तीन सदस्यांची समिती नेमण्याचा आदेश न्यायालयाने दिला. विरोधी पक्षनेते, मानवी हक्क आयोगाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष आणि राज्याचा प्रतिनिधी त्यावर असतील.

राज्य सरकार आवश्यकता भासल्यास येत्या २४ तासांमध्ये सागर बेट हे अधिसूचित क्षेत्र जाहीर करेल. आयोजनात त्रुटी आढळल्यास समिती बेटांवर तातडीने प्रवेशबंदीच शिफारस शासनाला करेल. त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाईल.

हेही वाचा: कृषी विभागामार्फत प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी पंधरवडा

दरम्यान, न्यायालयाच्या दिशानिर्देशांचे पालन होण्याबाबत डॉक्टर्स फोरमने शंका व्यक्त केली आहे. राज्य शासनाने सादर केलेले प्रतिज्ञापत्र निव्वळ धूळफेक असल्याची प्रतिक्रियाही नोंदविण्यात आली. गंगासागर परिसरातील वैद्यकीय पायाभूत सुविधा पुरेशा नसल्याचा दावाही करण्यात आला.

जीवन महत्त्वाचे

गंगासागर महोत्सवासाठी यापूर्वीच सुमारे ३० हजार भाविकांनी हजेरी लावली आहे. विविध ठिकाणी सुमारे ५० हजार साधू जमले आहेत. मकर संक्रातीचा मुहूर्त महोत्सवात महत्त्वाचा असतो, मात्र धार्मिक परंपरांपेक्षा जीवन महत्त्वाचे आहे. स्नान तसेच गर्दीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे मास्कच्या वापरासह सर्व नियमांचे काटेकोर पालन होण्याची आवश्यकता असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :West Bengal
loading image
go to top