esakal | ममता बॅनर्जी फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू - भाजपा नेत्याची टीका 
sakal

बोलून बातमी शोधा

ममता बॅनर्जी फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू - भाजपा नेत्याची टीका 

प्रचारसभांना वेग आला असून सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

ममता बॅनर्जी फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू - भाजपा नेत्याची टीका 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

West Bengal Assembly Election 2021 : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे प्रचार मोहिमेला सुरुवात झाली आहे. प्रचारसभांना वेग आला असून सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. बुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी येथील शिवमंदिराला भेट देऊन पुजा केली. तसेच अर्ज भरल्यानंतर घेतलेल्या सभेत त्यांनी चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्रांचे पठण केले होते. हाच धागा पकडत भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू असल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे. 
  
गिरीराज सिंह यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी फक्त निवडणुकीपुरते हिंदू आहेत. असं सिंह म्हणाले आहेत. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी मोदी आणि निवडणुकांच्या दडपणाखाली या स्तोत्रांचा जप केला. वाह रे मोदी, आज दीदी चंदीपाठाचे पठण करीत आहेत. ही निवडणूक तुम्हाला काय काय करायला लावत आहे.

भाजप नेते गिरीराज सिंह दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हणाले की, रोहिंग्यासोबत ममता बॅनर्जीही जरा घाबरल्या आहेत आणि त्यांना मशिदीत कि मंदिरात जायचे हे माहित नाही.

पश्चिम बंगालमध्ये २७ मार्च ते २९ एप्रिल या काळात विधानसभा निवडणुका आठ टप्प्यात पार पडणार आहेत.  
 

loading image