निवडणूक प्रचारावेळी ममता बॅनर्जींचा डान्स; भाजपवर सोडलं टीकास्त्र

mamata banarje dance
mamata banarje dance

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. विशेषत: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी पश्चिम बंगाल दौरा केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीकास्र सोडलं आहे. 

भाजप नेत्यांच्या दौऱ्यावेळी काही नेत्यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये वातावरण थोडं गंभीर बनलं आहे. मात्र यातच आता ममता बॅनर्जी एका संगीत कार्यक्रमात हसत खेळत उत्साहाने सहभागी झाल्याच्या दिसल्या. लोक कलाकारांच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी प्रसिद्ध संथाली नृत्यांगना बसंती हेंब्रमसोबत डान्स केला. 

ममता बॅनर्जी यांनी कार्यक्रमामध्ये काही लोककलाकारांचा सन्मान केला. यामध्ये संगीतकार, गायक आणि डान्सर यांचा समावेश होता. कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी संथाली डान्सर बसंती हेंब्रम यांनाही पुरस्कार दिला. यावेळी ममतांनी बसंतीसोबत डान्ससुद्धा केला. हेंब्रम यांनी ममता बॅनर्जींना डान्स स्टेप्स शिकवल्या. 

ममता बॅनर्जी यांनी या मंचावरूनही भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की बंगालला कधीच गुजरातमध्ये बदलता येणार नाही. भाजप पुन्हा पुन्हा बंगालमध्ये गुजरात मॉडेल आणणार असं म्हणत आहे. बंगालने देशाला राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत दिलं, देशाला जय हिंद ही घोषणासुद्धा दिली असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं.

भाजपवर पुन्हा आउटसायडरचा टॅग लावताना ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, एक दिवस पूर्ण जग बंगालला सलाम करेल. बंगालच्या मातीत जीवनाचा स्रोत आहे. आपल्याला या मातीला वाचवायचं आहे. असा कोणी नाहीय जो बाहेरून यावा आणि म्हणावा की आम्ही या जागेला गुजरात करू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com