KK Death | KK च्या मृत्यूला ममता बॅनर्जी सरकार जबाबदार; भाजपाचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamta Banerjee KK
KK च्या मृत्यूला ममता बॅनर्जी सरकार जबाबदार; भाजपाचा दावा

KK च्या मृत्यूला ममता बॅनर्जी सरकार जबाबदार; भाजपाचा दावा

प्रसिद्ध गायक KK याचा काल रात्री कोलकत्त्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवरून आता राजकारण पेटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. भाजपाने KKच्या मृत्यूला पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी सरकारला जबाबदार धरलं आहे. कॉन्सर्ट दरम्यान प्रचंड गोंधळ झाल्याचा आरोप भाजपाने कोलकत्ता प्रशासनावर केला आहे.

हेही वाचा: KK चा मृत्यू अनैसर्गिक; चेहरा आणि डोक्याला जखमा, पोलिसांची माहिती

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी बंगाल सरकारवर निशाणा साधला आहे. कोलकत्तामधल्या ग्रँड हॉटेलमध्ये आपला कॉन्सर्ट करून परतल्यानंतर KK चं निधन झालं. या कार्यक्रमादरम्यान आपल्याला उकाड्याचा त्रास झाल्याचं त्याने सांगितलं होतं. या सभागृहात क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. सभागृहात क्षमतेपेक्षा जवळपास दुप्पट गर्दी होती.

हेही वाचा: VIDEO: अखेरच्या क्षणात KK सोबत काय काय घडलं? समोर आली माहिती

या सभागृहाचे दरवाज्याचे जोडही तुटलेले होते, अशीही माहिती कॉन्सर्टला आलेल्या काही लोकांनी सांगितलं. KK सभागृहात उकडत असल्याची तक्रार अनेकदा करत होता. त्याला प्रचंड घाम येत होता आणि सातत्याने घाम पुसत होता. त्याने नंतर एका माणसाला सांगून जरा वातानुकुलनाकडे लक्ष देण्यासही सांगितलं.

हेही वाचा: 1 करोडची ऑफर देऊनही 'KK' ने गायला दिला होता नकार; काय होतं कारण...

या सगळ्याबद्दलच भाजपाने पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला आहे. सेलिब्रिटींना योग्य ते संरक्षण देण्यास कमी पडणे आणि व्यवस्थापनावरचं नियंत्रण गमावणे, असे आरोप भाजपाने पश्चिम बंगाल सरकारवर केले आहेत. भाजपाचे दिलीप घोष म्हणाले की, तुम्ही केवळ कल्पना करा की एवढ्या उकाड्यात, एवढ्या गर्दीत जेव्हा सभागृहातला एसी बंद केला जातो, तेव्हा तिथली परिस्थिती काय असेल? मला माहित नाही तो त्यामुळे आजारी पडला की नाही. पण ही परिस्थितीच त्याच्या निधनाला कारणीभूत आहे. यावरून हे दिसून येतं की सरकारचं काहीही नियंत्रण नाहीये.

तर KK चा मृतदेह कोलकत्त्यातून बाहेर पडण्याआधी पश्चिम बंगाल सरकारतर्फे त्याला विमानतळावरच बंदुकांची सलामी देण्यात येणार आहे.

Web Title: West Bengal Mamata Banerjee Government Is Responsible For Death Of Singer Kk Claims Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top