बांगलादेशी दहशतवाद्याला अटक; बनावट कागदपत्रं बनवून रचत होता कट

Bangladesh Terrorist
Bangladesh Terroristesakal
Summary

आरोपीच्या नावावर बांगलादेशातील विविध पोलीस ठाण्यांत तोडफोडीसह 25 गुन्हे दाखल आहेत.

पश्चिम बंगालच्या पोलिसांना (West Bengal Police) मंगळवारी मोठं यश मिळालंय. कोलकाता पोलीस (Kolkata Police) आणि बारानगर पोलिसांनी जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशच्या (JMB) एका दहशतवाद्याला पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातून अटक केलीय. बांगलादेशी दहशतवादी नूर नबी उर्फ ​​तमाल चौधरी (Terrorist Noor Nabi Chaudhary) याला बेलघरिया डनलप नॉर्दन पार्कमधून अटक करण्यात आलीय.

Bangladesh Terrorist
'पश्चिम बंगालप्रमाणं यूपीतही भाजपचा होणार खेला होबे'

कोलकाता पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'एका गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी बेलघरिया डनलप नॉर्दन पार्क परिसरात शोध मोहीम घेण्यात आली आणि एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.' बांगलादेशच्या गुप्तचर संस्थेकडून (Bangladesh Intelligence Agency) मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी नूर नबी डनलप भागातील नॉर्दन पार्क येथील निवासस्थानी एका महिलेसोबत राहत होता. एका गुप्त माहितीवरून, कोलकाता गुप्तचर अधिकारी (Kolkata intelligence officer) आणि बारानगर पोलिसांनी डनलपच्या निवासस्थानावर छापा टाकला आणि त्या दहशतवाद्याला अटक केलीय.

Bangladesh Terrorist
बॉम्बस्फोट खटल्याचा 13 वर्षांनंतर निकाल; 28 आरोपींची निर्दोष मुक्तता

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या नावावर बांगलादेशातील विविध पोलीस ठाण्यांत तोडफोडीसह 25 गुन्हे दाखल आहेत. या घटनेमुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी नूर नबी उर्फ ​​तमाल चौधरीची गुप्तचर विभागाचे (Intelligence Department) अधिकारी चौकशी करत आहेत. त्याचा अन्य कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का? याचाही तपास सुरूय. दरम्यान, बनावट कागदपत्रं बनवून तो इतके दिवस या निवासस्थानी राहत होतो, तरी प्रशासनाला याची खबर कशी नव्हती? असा सवाल उपस्थित होऊ लागलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com