esakal | पश्‍चिम बंगालचा पोल्ट्री उद्योग संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

पश्‍चिम बंगालचा पोल्ट्री उद्योग संकटात

पश्‍चिम बंगालचा पोल्ट्री उद्योग संकटात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकता - कोंबड्यांमुळे कोरोना विषाणूची लागण होते, अशा सोशल मीडियातून होणाऱ्या अपप्रचारामुळे पश्चिम बंगालमधील पोल्ट्री उद्योग संकटात सापडला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावरील अपप्रचारामुळे आत्तापर्यंत पोल्ट्री उद्योगाचे ३०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या भीतीने, कुक्कुटपालनाच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. तीन वर्षांपूर्वी बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री उद्योगाचे नुकसान झाले होते. त्या वेळी बर्ड फ्लूच्या प्रसारासाठी कोंबड्यांना जबाबदार मानले जात असल्याने अनेकांनी आपल्या खुराड्यातील कोंबड्यांना मारून टाकले होते. तर, त्यामुळे चिकनविक्रीवरही परिणाम झाला होता.

दरम्यान, चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या लसूण उद्योगावरही परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. हा परिणाम कोरोनामुळे न होता इतर कारणांनी झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. येथील अन्नतज्ज्ञांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून चीनमधील लसूण उत्पादक पिकावर ब्रोमाइडयुक्त कीटकनाशक फवारत असल्याने त्याची मागणी कमी होत आहे.