उत्तर २४ परगणा (पश्चिम बंगाल) : राज्यातून एक धक्कादायक घटना समोर (West Bengal Woman Assaulted) आली आहे. पॉर्न चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने एका महिलेला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली. तिच्या शरीरावर इतक्या गंभीर जखमा झाल्या आहेत, की सध्या ती सरळ उभीही राहू शकत नाही. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.