former MLA Anant Singhesakal
देश
Beur Jail : तुरुंगातून सुटका होताच काय म्हणाला 'हा' बाहुबली नेता? AK-47 प्रकरणात 10 वर्षांची सुनावली होती शिक्षा
former MLA Anant Singh : ताकदवान नेते आणि मोकामाचे माजी आमदार अनंत सिंह (Anant Singh) पाटणामधील बेऊर तुरुंगातून (Beur Jail) बाहेर आले आहेत.
Summary
लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना मे महिन्यात पॅरोल देण्यात आला होता. 15 दिवसांच्या पॅरोलवर ते बाहेर आले होते.
Bihar News : ताकदवान नेते आणि मोकामाचे माजी आमदार अनंत सिंह (Anant Singh) पाटणामधील बेऊर तुरुंगातून (Beur Jail) बाहेर आले आहेत. आज (शुक्रवार) पहाटे पाचच्या सुमारास ते कारागृहातून बाहेर आले. कारागृहातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ''आम्हाला न्याय मिळाला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर बरं वाटतं आहे.''