esakal | तुमचा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

बोलून बातमी शोधा

RT-PCR
तुमचा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोरोनाच्या या काळात तुम्हाला जर कोविड-१९ आजाराची लक्षण जाणवत असतील तर डॉक्टर तु्म्हाला RT-PCR चाचणी करुन घेण्याचा सल्ला देतात. त्यानुसार तुम्ही ही चाचणी करुन घेता, दोन दिवसांनी याचा रिपोर्ट तुमच्या हाती येतो. मात्र, RT-PCR चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नक्की यावर उपचार कसा घ्यायचा हे तुम्हाला कळत नाही. तुमची अशी गोंधळाची अवस्था असेल तर हा सल्ला तुमच्यासाठी महत्वाचा आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी याबाबत सल्ला दिला आहे.

RT-PCR चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास काय कराल?

RT-PCR चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तुम्ही तुमच्या स्थानिक डॉक्टरांना किंवा फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्व डॉक्टरांना कोविड-१९ चे प्रोटोकॉल माहिती आहेत त्यामुळे ते तुमच्या रिपोर्टनुसार ट्रिटमेंट सुरु करतील. जर ९० टक्के रुग्णांना वेळेत योग्य औषधोपचार मिळाले तर ते घरीच बरे होऊ शकतात. मेदंताचे डॉ. त्रेहान यांनी ही माहिती दिली.

व्हॉट्सअॅपवर फॉर्वर्ड होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका

कोरोना संबंधीच्या खूप जास्त बातम्या जाणून घेण्यावर लक्ष्य केंद्रीत करु नका, केवळ निवडक बातम्याच वाचा. सध्या व्हॉट्सअॅप विद्यापीठाचं स्तोम माजलं आहे. यावर येणाऱ्या माहितीकडे लक्ष देऊ नका. जबाबदारीचं भान ठेवा. हे भान तुम्ही स्वतः, डॉक्टर, समाज आणि मीडिया यांनी ठेवायला हवं, असं मत वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिलकुमार यांनी व्यक्त केलं.

लसीबाबत अनेक अफवा

लसीबाबत देशात सध्या अनेक अफवा पसरल्या आहेत. मात्र, देशात सुरु असलेल्या लसीकरणातील लसींचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. काही साईड इफेक्ट होत असतील ते क्षुल्लक आहेत. लस आणि कोविडची लक्षण ही दोन भिन्न गोष्टी आहेत. या गोष्टींचे योग्य पालन केल्यास आपल्याला कोरोनाच्या संसर्गाची चेन तोडता येऊ शकते, असंही ड. सुनिलकुमार यांनी सांगितलं.

ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरचा गैरवापर करु नका

एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया सांगतात, रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे काही मॅजिक बुलेट नाही. जे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यांना मध्यम ते गंभीर संसर्ग झालाय केवळ त्यांनाच हे इंजेक्शन गरजेचं आहे. तसेच ज्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांहून कमी आहे, त्यांनाच याची गरज आहे. त्यामुळे डॉक्टरांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरचा गैरवापर करु नये. अनेक रुग्ण तर घरीच विलगीकरणात राहून बरे होऊ शकतात.