भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या शनिवारी (१० मे) शस्त्रसंधी झाली. या संपूर्ण प्रक्रियेत लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांची (डीजीएमओ) भूमिका महत्त्वाची ठरली. ‘डीजीएमओ’ पदावरील अधिकाऱ्याचे कार्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी....‘डीजीएमओ’ पदाबाबत...डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स अर्थात ‘डीजीएमओ’ वरिष्ठ लेफ्टनंट ‘जनरल’ रँकचा अधिकारी असतो.डीजीएमओ हे पद लष्कराशी संबंधित असून हवाई दलात ‘डीजीएओ’ व नौदलात ‘डीजीएनओ’ हे समकक्ष अधिकारी असतात.मोहिमेची योजना आखणे व विविध सैन्यदल प्रमुखांना माहिती देणे हे त्यांचे काम.युद्धाची रणनीती आखणे, सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आदी महत्त्वाची कामे केली जातात.सध्या ‘डीजीएमओ’ लेफ्टनंट जनरल राजीव घई आहेत.‘डीजीएमओं’ची निवड सैन्य दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्रालयाकडून केली जाते..महत्त्वाची जबाबदारी‘डीजीएमओं’कडे प्रत्यक्ष लढाई, दहशतवादविरोधी कारवाया आणि शांतता प्रस्थापनेसारख्या लष्करी मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे कार्य सोपवले जाते.लष्कर, हवाई दल आणि नौदलांमध्ये समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करण्याचे काम लष्करी कारवाई विभागाचे संचालक करतात.लष्कराची रणनीती, गुप्तचर यंत्रणांची माहिती या सर्वांची माहिती घेऊन महत्त्वाच्या मोहिमा पार पाडण्याची जबाबदारी ‘डीजीएमओं’कडे असते..राष्ट्रीय सुरक्षेतील भूमिका‘डीजीएमओ’ हे देशाच्या संरक्षण धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. भारत आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये, जिथे लष्करी तणाव झपाट्याने वाढू शकतो, तिथे ही भूमिका विशेषतः महत्त्वाची असते.‘डीजीएमओं’चा तातडीच्या, तसेच दीर्घकालीन सुरक्षेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणे तयार करण्यात सहभाग असतो. यात प्रामुख्याने धोक्यांचे मूल्यांकन करणे याचा समावेश होतो.‘डीजीएमओं’चे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे इतर देशांतील समकक्ष लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवणे. तणाव नियंत्रित ठेवण्यासाठी आणि संघर्ष उधळून लावण्यापासून रोखण्यासाठी ही भूमिका अत्यावश्यक असते..Bhushan Gavai : ‘वडिलांचा प्रवास प्रेरणादायी’; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कन्या करिश्मा यांची भावना.सशस्त्र दलांची सज्जतासशस्त्र दल नेहमीच कारवाईसाठी सज्ज राहतील याची खात्री करण्याची जबाबदारी ‘डीजीएमओं’ची असते. यात प्रशिक्षण सरावांची देखरेख करणे, उपकरणांची देखभाल व सैनिक तैनातीसाठी सज्ज आहेत याची खात्री करणे यांचा समावेश होतो. ‘डीजीएमओं’ना लष्करी उद्दिष्टे व राजनैतिक भूमिका यांच्यात समतोल राखावा लागतो. यासाठी लष्करी रणनीती व आंतरराष्ट्रीय संबंधांचे सखोल आकलन आवश्यक असते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.