Guard Of Honour
Guard Of Honouresakal

Guard Of Honour: पंतप्रधान मोदींना लष्कराने दिलेला 'गार्ड ऑफ ऑनर' म्हणजे काय?

आज 15 ऑगस्ट 2023, भारताला स्वातंत्र्य मिळून आज 76 वर्ष पूर्ण झाली आहेत.

आज 15 ऑगस्ट 2023, भारताला स्वातंत्र्य मिळून आज 76 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर यंदा 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास तयारी करण्यात आली आहे. 21 तोफांची सलामी देण्यात आली. तसेच, लाल किल्ल्यावर पोहोचल्यावर पंतप्रधानांना राष्ट्रसेवेसाठी म्हणजेच तिन्ही सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्यांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले.(what is guard of honor which has been given to prime minister modi by the three forces)

राजकीय नेते आणि त्यांना दिली जाणारी VIP ट्रिटमेंट हा विषय हा कायम चर्चेत असतो. यातलाच एक प्रकार म्हणजे गार्ड ऑफ ऑनर.

नेमक काय असतो गार्ड ऑफ ऑनर?

गार्ड ऑफ ऑनर हा एक प्रकारचा सन्मान आहे. महत्त्वपूर्ण व्यक्ती आल्या नंतर तो दिला जातो. हा एक प्रोटोकॉल समजण्यात येतो. यात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मधील मंत्री असतात. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा राज्य पोलिसांच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात देण्यात येते.

गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलिसांची एक वेगळी तुकडी रिझर्व ठेवण्यात येते. जे कर्मचारी पोलीस ठाण्यात तैनात असतात त्यांना सलामीची चांगली प्रक्टिस नसते. त्यामुळे गार्ड ऑफ ऑनरसाठी एक तुकडी रिझर्व ठेवण्यात येते.

१९४७ मध्ये जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाच्या तीनही दलाने मिळून खास तुकडी तयार केली होती. भूदल, वायुदल आणि नौदलच्या प्रत्येकी १०० जवान यात सामील होते. ट्राय सर्विस ऑफ गार्ड म्हणण्यात येते. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. यांना राष्ट्रपती भवन आणि केंद्रीय सचिवालय येथे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि व्हिआयपी व्यक्तीच्या दौऱ्या निम्मित तैनात करण्यात येते.

कशा प्रकारे गार्ड ऑफ ऑनर देण्यात येते?

सलामीच्या वेळी विशेष महत्वाच्या व्यक्तीला डायस वर उभे करण्यात येते. गार्डचा कमांडर ज्यांना सलामी द्यायची आहे त्याच्या जवळ जाऊन गार्डचे निरीक्षण करण्यासाठी सांगण्यात येते. गार्डकडून सलामी दिल्यानंतर ती व्यक्ती पुढे जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com