कोणी गेम खेळतंय, कोणी तंबाखू मळतंय; भाजपा आमदारांचा विधानसभेतला व्हिडीओ व्हायरल

Samajwadi Party Video
Samajwadi Party VideoSakal

समाजवादी पार्टीकडून विधानसभेतले दोन व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ आहेत भाजपाच्या आमदारांचे. हे दोघेही सत्रादरम्यान गेम खेळताना आणि तंबाखू मळताना दिसून आले. समाजवादी पार्टीने ट्विट केलेल्या या दोन व्हिडीओमुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या लोकांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही. यांनी विधानसभेला फक्त मनोरंजनाचं ठिकाण बनवलं आहे. हे प्रकार लाजिरवाणे असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यातला पहिला व्हिडीओ महोबाचे आमदार राकेश गोस्वामी आहेत, असा दावा समाजवादी पार्टीने केला आहे. या व्हिडीओमध्ये गोस्वामी पत्त्यांचा खेळ खेळताना दिसत आहेत.

तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये झाशीचे आमदार रवी शर्मा दिसत आहेत. विधानभवनात बसून ते तंबाखूजन्य पदार्थ खाताना दिसत आहेत. त्यांनी खोकत रजनीगंधाचा डबा बाहेर काढला आणि आपल्या डेस्कखाली ठेवून ते खाताना दिसले. आता हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com