अमित शहा म्हणाले होते, मैं समंदर हूं, लौटकर जरूर आऊंगा

वृत्तसंस्था
Thursday, 22 August 2019

केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार सत्तेवर असताना तत्कालीन भाजप नेते आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अटकेसाठी सीबीआयचे पथक गेले होते. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या कार्यकाळात पी. चिदंबरम यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रिपदाचा कार्यभार होता.

नवी दिल्ली : आयएनक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्यानंतर सर्वांना 2010 मध्ये सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांना अटक केल्याची आठवण झाली. त्यावेळी अमित शहा यांनी मै समंदर हूं, लौटकर जरुर आऊंगा हा म्हटलेला शेर आठवला.

केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार सत्तेवर असताना तत्कालीन भाजप नेते आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अटकेसाठी सीबीआयचे पथक गेले होते. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या कार्यकाळात पी. चिदंबरम यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रिपदाचा कार्यभार होता. त्यावेळी 25 जुलै 2010 रोजी चिदंबरम यांनी अमित शहा यांच्या अटकेसाठी सीबीआयला धाडले होते. शहा‌ चार दिवस बेपत्ता होते. त्यानंतर ते थेट भाजपच्या ब्रिफिंगला‌ ‌आले होते. त्यावेळी त्यांना अटक झाली होती. 

आज जवळपास 9 वर्षांनंतर हेच वास्तव समोर आले आहे. फक्त आता अमित शहा यांच्याजागी सध्या चिदंबरम आहेत तर चिदंबरम यांच्या जागी सत्तेवर अमित शहा आहेत. अमित शहा यांना त्यावेळी गुजरातमधून तडीपार करण्यात आले होते. तसेच त्यांना कारागृहातही राहावे लागले होते. आता चिदंबरम यांच्याबाबत न्यायालयात काय निर्णय होतो, ते पाहावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when in same manner CBI arressted Amit Shah in case Chidambaram was then home minister