

Banarasi Saree
esakal
उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मुबारकपूर हे छोटे शहर हाताने विणलेल्या रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील खास वैशिष्ट्य म्हणजे एक साडी एका कारागिराकडून तयार होत नाही. कच्चा रेशीम तयार करणारे, रंगकाम करणारे, डिझाईन तयार करणारे आणि विणकाम करणारे अशा अनेक कारागिरांच्या हातातून प्रवास करत ही साडी बाजारात पोहोचते. त्यामुळे प्रत्येक साडीमागे अनेक कुटुंबांची मेहनत दडलेली असते.