esakal | भारताचं अभिनंदन! गाठला 75 कोटी लसीकरणाचा टप्पा; WHOनेही केलं कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

भारतानं पूर्ण केला 75 कोटी लसीकरणाचा टप्पा; WHOकडून कौतुक

भारतानं पूर्ण केला 75 कोटी लसीकरणाचा टप्पा; WHOकडून कौतुक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारताने लसीकरणामध्ये मोठा टप्पा गाठला आहे. भारतात आतापर्यंत जवळपास 75 कोटी डोस देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. गेल्या 16 जानेवारी रोजी भारतात लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आली होती. त्यानंतर आजतागायत लसीकरण मोहिम सुरु असून आतापर्यंत 75 कोटी डोस देण्यात आले आहेत.

याबाबतची माहिती देताना मनसुख मांडविय यांनी म्हटलंय की, भारताचे अभिनंदन! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ, सबका प्रयास' या मंत्राला अनुसरुन जगातील सर्वांत मोठा लसीकरणाचा कार्यक्रम निरंतर नवे आयाम गाठत आहे. आझादी का अमृत महोत्सव म्हणजेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षामध्ये देशाने 75 कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे. पुढे त्यांनी #SabkoVaccineMuftVaccine असंही म्हटलं आहे.

याबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेनं देखील भारताचं कौतुक केलं आहे. WHO ने म्हटलंय की, भारताने निव्वळ 13 दिवसांमध्ये 65 कोटींवरुन 75 कोटी डोस देण्याचा टप्पा गाठला आहे. याबद्दल भारताचं अभिनंदन देखील WHO ने केलं आहे.

loading image
go to top