Indian Air Force : एअर मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; कारगिल युद्धातील अनुभवी वैमानिकाकडे सर्वोच्च पदाची धुरा

विद्यमान हवाई दलप्रमुख अमर प्रीत सिंह ३१ ऑक्टोबरला निवृत्त होणार; 'तेजस'सह स्वदेशी संरक्षण सज्जतेला मिळणार गती
Air Marshal Ashutosh Dixit appointed as the new chief of the Indian Air Force

Air Marshal Ashutosh Dixit appointed as the new chief of the Indian Air Force

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या (IAF) नव्या प्रमुखपदी सध्याचे हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह हे येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यानंतर दीक्षित हे या सर्वोच्च पदाची सूत्रे स्वीकारतील. संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला गती देण्यासाठी आणि स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान 'एलसीए तेजस'सह इतर देशांतर्गत विमान प्रकल्पांना बळ देण्यात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची मानली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com