Who is Dhruv Rathee: हरियाणाचा ध्रुव राठी यूट्यूबर कसा बनला? महिन्याला किती पैसे कमावतो

Who is Dhruv Rathee famous YouTuber: सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्तीला ध्रुव राठी माहिती नसण्याची शक्यता खूप कमी आहे. ध्रुव राठी प्रसिद्ध यूट्यूबर, सोशल मीडिया अॅक्टिविस्ट आणि ब्लॉगर आहे.
Dhruv Rathee
Dhruv Rathee
Updated on

Dhruv Rathee: सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्तीला ध्रुव राठी माहिती नसण्याची शक्यता खूप कमी आहे. ध्रुव राठी प्रसिद्ध यूट्यूबर, सोशल मीडिया अॅक्टिविस्ट आणि ब्लॉगर आहे. यूट्यूबवर त्याला जवळपास १५ मिलियन फॉलोवर्स आहेत, तर इन्स्टाग्रामवर २.४ मिलियन फॉलोवर्स आहेत. टाईम मॅगझीनच्या यादीत त्याचा समावेश इमर्जिंग लीडर्स २०२३ म्हणून करण्यात आला होता. (Who is Dhruv Rathee famous YouTuber How much money does he earn social media)

गेल्या अनेक वर्षांपासून ध्रुव जर्मनीमध्ये राहत आहे. याच ठिकाणावरुन तो राजकीय, सामाजिक आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्हिडिओ करत असतो. ध्रुवच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली असते. शिवाय यासाठी त्याने अनेक पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. माध्यमातील बातम्या, व्हिडिओ, आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन तो व्हिडिओ सादर करत असतो. पॉलिटिकल व्हिडिओसाठी तो विशेषत: प्रसिद्ध आहे.

Dhruv Rathee
YouTube India : आई-मुलाच्या 'तशा' व्हिडिओंमुळे NCPCR भडकले, यूट्यूब इंडियाला पॉक्सोचं उल्लंघन केल्याबद्दल पाठवली नोटीस

सुरुवातीला ट्रॅव्हल व्हिडिओ

सुरुवातीच्या काळात तो राजकीय व्हिडिओ करायचा नाही. त्याने सुरुवातीला ट्रॅव्हल व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर २०१३-१४ च्या आसपास त्याने राजकीय आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या विषयांवर व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. त्याची व्हिडिओ सादर करण्याची पद्धत आणि तो देत असलेली माहिती लोकांना महत्त्वाची वाटू लागली. हळूहळू त्याचे फॉलोवर्स वाढू लागले.

मूळचा हरियाणाचा

२९ वर्षीय ध्रुव राठी जाट समुदायातून येतो. तो मुळचा हरियाणाच्या रोहतकचा आहे. दिल्लीमध्ये त्याचे लहानपण गेले. तो आरके पुरमधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो जर्मनीमध्ये गेला. येथेच त्याने मॅकेनिकल इंजीनियरिंगची डिग्री मिळवली. त्यानंतर येथेच त्याने अक्षय उर्जा या विषयात मास्टर डिग्री पूर्ण केली.

ध्रुव राठीने 'ध्रुव राठी व्लॉग्स' नावाने आणखी एक यूट्यूब चॅनल सुरु केली आहे. याठिकाणी तो आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे व्हिडिओ शेअर करत असतो. त्याने नेटफ्लिक्स इंडियासोबत 'डिकोड विथ ध्रुव' हा एक शो देखील केला होता.

ध्रुवचे लग्न

ध्रुवचे लग्न २०२१ मध्ये जुलीसोबत झाले आहे. त्याने २०२२ मध्ये पुन्हा एकदा भारतीय परंपरेने जुलीसोबत लग्न केले. माध्यमातील माहितीनुसार, ध्रुव आपली पत्नी जुलीला २०१४ मध्ये पहिल्या वेळेस भेटला होता. त्यांनंतर त्यांनी डेटिंग सुरु केली. आपल्या पत्नीसोबत मिळून तो एक यूट्यूब चॅनेल चालवतो. यात तो खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतो.

फॅबसेलेबी डॉड इन या वेबसाईटच्या दाव्यानुसार, त्याची संपत्ती ७ मिलियन डॉलर म्हणजे ५८ कोटी रुपये आहे.याच वेबसाईटच्या दाव्यानुसार तो यूट्यूबवर महिन्याला ४० लाख रुपये कमावतो. वार्षिक तो १२ कोटी रुपये कमावतो.

Dhruv Rathee
Cotton Candy: 'बुढ्ढी के बाल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉटन कँडीवर बंदी का आणण्यात आलीये?

राजकीय अजेंडा

ध्रुव राठी हा भाजप आणि मोदी सरकारविरोधात अजेंडा चालवतो असा आरोप त्याच्यावर केला जातो. ध्रुवचे मोदी सरकारविरोधातील अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले गेले आहेत. ध्रुव आम आदमी पक्षाला झुकते माप देतो असाही दावा केला जातो.

ध्रुवने शेअर केलेले सर्व व्हिडिओ पाहिल्यास त्याने विविध विषयांना हात घातल्याचं दिसतं. त्यामुळे तो एका विशिष्ठ पक्षाच्या विरोधातच व्हिडिओ करतो हे म्हणणे पक्षपातीपणाचे ठरले. शिवाय त्याची सोशल मीडियावरील एन्ट्री आणि मोदी सरकार सत्तेत येणे जवळपास एकाच वेळेस झाले. त्यामुळे सध्याच्या मुद्द्यावर व्हिडिओ करणे क्रमप्राप्तचे होते असं म्हणावं लागेल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com