
अख्ख्या भारतात सायन्स मध्ये PHD करणारी पहिली महिला एक मराठी मुलगी होती
Kamala Sohonie: कमला यांचा जन्म१८ जून १९११ रोजी इंदोर येथे झाला होता. त्यांचे वडील नारायण भागवत आणि काका माधवराव भागवत हे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स मधून रसायनशास्त्र विषयावरची पदवी घेणाऱ्या पहिल्या विद्याथ्यांपैकी एक होते.कमला सोहोनी’ यांनी बालपणीच या दोघांकडून विज्ञानाचे धडे गिरवले होते.(first woman do PHD in Science in India was a Marathi girl)
ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत आणि कमला दोघी बहिणी होत्या. मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. त्या काळात पदवी मिळवणा-या कमला एकमेव आणि पहिल्या महिला होत्या. तंत्रज्ञान संशोधन शिष्यवृत्ती आणि स्पिंगर रिसर्च शिष्यवृत्ती मिळवल्यानंतर त्यांनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगलोर’ या संस्थेत प्रवेश मिळवला. या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी देखील त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. तेथे डॉ. सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पुढे केंब्रिजमध्ये प्रा. एफ. हाफकिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधनकार्य केले. मुंबई, दिल्ली आणि बडोदा येथील महाविद्यालयांतून जीवरसायशास्त्र विभाग सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. म्हशीचे दूध मातेच्या दुधासमान करण्याची प्रक्रिया शोधणे, दुधातील व कडधान्यांतील प्रथिने शोधणे, निरा पेयाचे परिणाम व उपयोग आणि ताडगुळाविषयीचे त्यांचे संशोधन केले.
त्यांच्या या सर्व कामाचा गुणगौरव करण्यासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला. इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, मुंबई याच्या विभागप्रमुख असणा-या कमलाबाईंनी अन्नभेसळीवरही संशोधन केले होते. ‘आहारगाथा’ हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहे. पुढे त्यांचे ८ सप्टेंबर १९९७ रोजी त्यांचे निधन झाले.
Web Title: Who Is Kamala Sohonie Indian Biochemist First Woman Do Phd In Science In India Was A Marathi Girl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..