
Crime News: लग्न करुन फसवणूक करणारे अनेक प्रकरणे तुम्ही वाचली असावीत पण तब्बल दहा राज्यातील 27 महिलांना लग्नाच्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करणारा डॉ बिभू प्रकाश स्वैन उर्फ रमेश स्वैन चांगलाच चर्चेत आहे.
या लखोबा लोखंडेने 27 उच्च शिक्षित स्त्रियांशी लग्न केले आणि त्यांची फसवणूक केली होती.या दरम्यान तो फरारही होता मात्र मागील वर्षी तो पोलिसांच्या हाती लागला. सध्या तो इडीच्या रडारवर आहे. (who is ramesh swain or bibhu prakash swain married 27 women and done fraud)
आतापर्यंत आपण नाटकामध्येच मी तो नव्हे म्हणणारा लखोबा लोखंडे पाहिलात पण आता डॉ रमेश स्वैनच्या या फसवणूकींच्या प्रकरणाने सर्वांचीच झोप उडाली आहे. कोण आहे हा रमेश स्वैन आणि याने कशाप्रकारे महिलांची फसवणूक केली, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
कोण आहे हा लखोबा लोखंडे म्हणजेच डॉ बिभू प्रकाश स्वैन उर्फ रमेश स्वैन?
डॉ रमेश स्वैन हा ६६ वर्षाचा ओडिसातील कुख्यात ठग आहे. त्याने तब्बल दहा राज्यातील २७ महिलांशी लग्न केले आणि त्यांची लाखोंची फसवणूक केली. रमेश स्वैन हा मॅट्रीमोनियल साईटवरुन महिलांशी ओळख करायचा आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. लग्न करुन पैसे घ्यायचा आणि फरार व्हायचा.
विशेष म्हणजे विधवा आणि घटस्फोटीत महिला त्याच्या टार्गेटवर होत्या. अशा २७ महिलांची त्याने फसवणूक केली. यात आणखी विशेष बाब म्हणजे या महिला सुशिक्षित होत्या.
एवढंच काय बोगस क्रेडिट कार्डद्वारेही त्याने केरळमध्ये काही बँकाची एक कोटींची फसवणूक केली होती तर हैदराबादमध्ये काही पालकांना त्यांच्या मुलांना एमबीबीएसची जागा मिळवून देतो असं सांगत त्यांची जवळपास दोन अडीच कोटींची फसवणूक केली होती.
२०२१ मध्ये एका पत्नीच्या तक्रारीवरुन त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि हे सर्व प्रकरण उघडकीस आणलं. तो सध्या भुवनेश्वरमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.आता पुन्हा चर्चेच येण्याचं कारण म्हणजे तो आता ईडीच्या रडारवर आलाय. आता ईडी चौकशी दरम्यान आणखी या लखोबा लोखंडेचं काय पितळ उघडं पडतं, हे पहावं लागेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.