Lok Sabha Election 2024 : TMCविरोधात भाजपचा मास्टरस्ट्रोक! रेखा पात्रा यांना दिली उमेदवारी; संदेशखालीशी आहे थेट संबंध

Lok Sabha Election 2024 Latest News : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे.
who is rekha patra sandeshkhali victim BJP Canditate for lok sabha election 2024 shahjahan sheikh Case
who is rekha patra sandeshkhali victim BJP Canditate for lok sabha election 2024 shahjahan sheikh Case

Lok Sabha Election 2024 Latest News : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा जागेवरून रेखा पात्रा यांना भाजपन तिकीट दिलं आहे. रेखा पात्रा यांना उमेदवारी देऊन भाजपने येथे मोठा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण रेखा पात्रा या टीएमसी नेता शाहजहां शेख याच्या अत्याचारांने पीडित महिलांपैकी एक आहेत. संदेशखाली येथे झालेल्या आंदोलनाचा त्या प्रमुख चेहरा होत्या.

रेखा पात्रा कोण आहेत? (who is Rekha Patra)

रेखा पात्रा यांनी शाहजहां शेख याने आपली जमीन बळकावली तसेच लैंगिक शोषण केल्याचे आरोप कले होते. हे प्रकरण पेटल्यानंतर टीएमसीने शेख याला पक्षातून काढून टाकले. त्यानंतर त्याला अटक देखील झाली. या प्रकरणात आतापर्यंत १४ हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

भाजपच्या आयटी सेलचे चीफ अमित मालवीय यांनी पोस्ट करत रेखा पात्रा संदेशखाली येथील पीडितांपैकी एक असल्याचे सांगितले आहे. त्यांच्यावर देखील शाहजहां शेख याच्याकडून अत्याचार झाले. भाजप संदेशखाली येथील महिलांच्या पाठिशी आहे. शेख शाहजहां याच्या विरोधात आवाज उंच करणाऱ्यांमध्ये त्या पहिल्या होत्या. तिकीट मिळाल्यानंतर रेखा पात्रा यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार देखील मानले, सोबतच त्यांनी गावातील महिलांसोबत कायम उभे राहाणार असल्याचा निर्धार देखील व्यक्त केला.

who is rekha patra sandeshkhali victim BJP Canditate for lok sabha election 2024 shahjahan sheikh Case
Loksabha Election 2024 : उमेदवारीवरून भाजप-तृणमूलमध्ये असंतोष ; उत्तर बंगालमध्ये भाजपला बसू शकतो राजकीय फटका

पात्रा यांनी सांगितलं की, भाजपने मला बशीरहाटसोबतच संदेशखाली येथील लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. भाजपने दावा केला आहे की संदेशखाली येथे सध्या आनंदाचे वातावरण आहे. तसेत रेखा पात्रा यांच्या तक्रारीनंतरच शहाजहां शेख, शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांना अटक करण्यात आली होती.

भाजपने पश्चिम बंगालमधील ४२ पैकी ३८ जागांवर उमेदवार जाहीर केले आङेत. तसेच अद्याप डायमंड हार्बर, आसनसोल, बीरभूम आणि झाडग्राम येथील जागांवर उमेदवार जाहीर होणे बाकी आहे.

who is rekha patra sandeshkhali victim BJP Canditate for lok sabha election 2024 shahjahan sheikh Case
Solapur Lok Sabha Election 2024 : तुमचंही सोलापुरात स्वागत...; भाजपकडून राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदेंचा टोला

कलकत्ता हाय कोर्टाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांना देखील पूर्व मिदनपूर च्या तमलुक येथून तिकीट देण्यात आलं आहे. तापस रॉय यांना कोलकता उत्तर मधून संधी देण्यात आली आहे. संदेशखाली येथे टीएमसी नेता शेख शाहजहां आणि त्याच्या साथीदारांनी महिलांवर लैंगिक अत्याचार तसेच जमीनी हिसकावून घेतल्याचा आरोप होता. याखेरीज शाहजहां राशन घोटाळ्यामध्ये देखील आरोपी होता. याच प्रकरणात त्याच्यासंबंधीत अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये अनेक अधिकारी जखमी देखील झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com