sant wale baba perfume magh mela 2026
sakal
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या माघ मेळ्यात सध्या एका नागा संन्याशाची जबरदस्त चर्चा रंगली आहे. सेक्टर दोनमध्ये वास्तव्यास असलेले हे बाबा आपल्या अंगाला भस्म लावतात, डोळ्यावर काळा चष्मा चढवतात आणि येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे स्वागत अत्तर (परफ्यूम) शिंपडून करतात. याच कारणांमुळे त्यांना भाविकांनी ‘सेंट बाबा’ हे नाव दिले आहे.