
जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आतापर्यंत या हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचे प्राण गेले असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी 'द रेजिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. TRF चे मुख्यालय पाकिस्तानमध्ये असून, लष्कर-ए-तोयबाचा हा प्रॉक्सी गट मानला जातो.