

Albinder Dhindsa Eternal Limited Group CEO Blinkit founder Zomato leadership change 2026
esakal
Zomato New CEO : झोमॅटोचे आधीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी राजीनामा दिला आहे. अलबिंदर ढींडसा (Albinder Dhindsa) हे भारतीय स्टार्टअप जगातील एक मोठे नाव असून १ फेब्रुवारी २०२६ पासून ते झोमॅटोची मूळ कंपनी 'इटर्नल लिमिटेड' (Eternal Limited) चे नवीन ग्रुप सीईओ म्हणून पदभार स्वीकारत आहेत. मूळचे पंजाबचे असलेले अलबिंदर यांनी IIT दिल्लीतून पदवी आणि अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीतून MBA पूर्ण केले आहे. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.