Covid-19 : कोरोनाचं संकट टळलेलं नाही; WHOने केलं सतर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19

Covid-19 : कोरोनाचं संकट टळलेलं नाही; WHOने केलं सतर्क

नवी दिल्लीः जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने कोरोना व्हायरसच्या बाबतीत जगाला पुन्हा एकदा अलर्ट केलं आहे. कोरोना संपलेला नाही, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.

डब्ल्यूएचओने सांगितलं की, कोरोना हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय ठरला आहे. कोरोना काळातल्या तीन वर्षांमध्ये आज ३० जानेवारी रोजी WHOने हाय लेव्हल अलर्ट जारी केलाय.

हे ही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम यांनी सांगितल की, कोरोना हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. अजूनही कोरोना गेलेला नाही. त्यामुळे काळजी घेऊन सतर्क राहा.

WHOने २७ जानेवारी रोजी महामारीच्या अनुषंगाने १४ वी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये कोरोना महामारीसंबंधी समितीने केलेल्या सूचनांशी महासंचालक सहमत होते. कोरोना व्हायरसशी संबंधित आरोग्य यंत्रणेसाठी हा रोग धोकादायक संक्रमण करणारा ठरला असल्याचं म्हटलं आहे.

मागील डिसेंबर महिन्यामध्ये चीनमध्ये कोरोनाने रौद्र रुप धारण केल्याचं सांगण्यात आलेलं होतं. चीनमधले व्हीडिओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता आणि मृतदेहांचा खच पडलेला दिसत होता. यासंबंधी चीनने कसलाही खुलासा केला नाही. त्यामुळे चीनविषयी जगभरात भीती निर्माण झाली होती.

जानेवारी महिन्यात भारतात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होईल, असंही सांगितलं जात होतं. परंतु जानेवारी महिना संपत आलेला असून कोरोना रुग्णसंख्या सुदैवाने वाढलेली नाही. तरीही भारत सरकार अलर्ट मोडवर असून योग्य त्या उपाययोजना राबवण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :Coronaviruscovid19