
भारताने बंदी घातलेल्या YouTube चॅनेलवर होतं तरी काय?
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information And Broadcasting) बनावट बातम्या प्रसारित करण्यासाठी आणि भारतविरोधी प्रचार करणाऱ्या वीस यूट्यूब चॅनेल (India Banned 20 You Tube Channels) आणि दोन वेबसाइट्सवर बंदी घातली. काश्मीर, भारतीय लष्कर, भारतातील अल्पसंख्याक समुदाय, राम मंदिर, जनरल बिपिन रावत आणि इतर यासारख्या विषयांवर फुटीरतावादी मजकूर पोस्ट करण्यासाठी चॅनेलचा वापर केला जात होता, अशी सूत्रांची माहिती आहे. हे चॅनेल कोणता मजकूर प्रसारित करतात आणि ते कोणाद्वारे चालवले जात आहेत? याबाबतची माहिती 'इंडिया टुडे'ने दिली आहे.
कोण चालवत होतं YouTube चॅनेल? -
भारत सरकारने बंदी घातलेल्या वीस YouTube चॅनेलपैकी किमान 15 चॅनेल ‘नया पाकिस्तान ग्रुप’ या एकाच ग्रुपद्वारे चालवले जात होते. नया पाकिस्तान ग्रुप (NGP) ने YouTube वर खोट्या बातम्यांचा प्रचार करण्यासाठी पाकिस्तानी न्यूज अँकर आणि कलाकारांचा वापर केला.
भारतीय गुप्तचर सूत्रांच्या म्हणण्यानुसार, समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आणि भारतातील तरुणांना लक्ष्य करण्यासाठी या गटाला पाकिस्तानी एजन्सीकडून निधी दिला जात आहे. बंदी घातलेल्या वीस यूट्यूब चॅनेलचे एकूण 35 लाख लोक सदस्य आहेत. यापैकी 31 लाख सदस्य हे पंधरा YouTube चॅनेलचे आहेत जे NPG द्वारे चालवले जात आहेत.
चॅनेलवरून कोणता मजकूर प्रसारीत व्हायचा? -
या चॅनलवर चाललेल्या काही कथांमध्ये "तुर्की आर्मी एंटर इन न्यू दिल्ली", "अफगान तालिबानने 300 भारतीय गुप्तहेरांना फाशी दिली आणि मोदी आणि योगींना संदेश द्या" आणि "जो बायडेन आणि एर्दोगन काश्मीरमध्ये सैन्यात दाखल होणार आहेत. मोदींनी कलम ३७० रद्द केले, अशा अनेक मुद्द्यांवर माहिती प्रसारीत करण्यात आली. व्युव्हर्सने आपल्या चॅनलवर विश्वास ठेवावा यासाठी YouTube चॅनलला पंजाब व्हायरल आणि हिस्टोरिकल फॅक्ट्स सारखी नावे देण्यात आली.
नया पाकिस्तान ग्रुपद्वारे चालविण्यात येणाऱ्या YouTube चॅनलची यादी
१) फिक्शनल -
सबस्क्राईबर - ३ लाख
मजकूर - 7 अरब देश भारताचा तेल पुरवठा कमी करण्यास तयार आहेत.
२) हिस्टॉरिकल फॅक्ट्स -
सबस्क्राईबर - 9.44 लाख
मजकूर : तुर्क आर्मी बदला घेण्यासाठी अयोध्या राम मंदिरात प्रवेश करणार.
३) पंजाब व्हायरल
सबस्क्राईबर - N/A
मजकूर : पंतप्रधान मोदींनी काश्मीरमधील पराभव मान्य केला
४) नया पाकिस्तान ग्लोबल
सबस्क्राईबर - ७.७६ लाख
मजकूर : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अयोध्येत आपले सैन्य पाठवले
५) पंच लाईन
सबस्क्राईबर - १.१६ लाख
मजकूर : काश्मीर मुजाहेद्दीनने लक्ष्य केलेल्या काश्मीरच्या प्रशिक्षण केंद्रात 20 भारतीय लष्कराचे जनरल ताब्यात
६) कव्हर स्टोरी
सबस्क्राईबर - N/A
मजकूर : भारतातील मुस्लिम नरसंहार दरम्यान संयुक्त राष्ट्र संघाने RSS प्रमुखाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय घेतला
७) गो ग्लोबल कॉमर्स
सबस्क्राईबर -१२,२००
माहिती - भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान आणि चीनविरोधात पराभव पत्करला.
८) जुनेद हलीम ऑफिशियल
सबस्क्राईबर - N|A
मजकूर - आसामधील हजारो मुस्लीम अफगाणीस्थानातील तालिबान्यांकडे मदतीसाठी गेले.
९) तय्यब हनिफ -
सबस्क्राईबर - N|A
मजकूर - राजनाथ सिंह, बिपन रावत, नरवणे यांच्यावर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत
१०) झैन अली ऑफिशियल -
सबस्क्राईबर - १.३९ लाख
मजकूर - बिपिन रावत एमआय-१७ हेलिकॉप्टर दुर्घटनेत १२ भारतीय हवाई दलाच्या सैनिकांना अटक
११) मोहसीन राजपूत ऑफिशियल -
सबस्क्राई - N\A
मजकूर - तमिळ टायगर्सने बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरवर रॉकेटने हल्ला केल्याचा पुरावा भारतीय लष्कराने दिला.
१२) कानिझ फातीमा -
सबस्क्राईबर - N\A
मजकूर - कलम 370 संपवण्यासाठी अफगाण तालिबान काश्मिरी मुजाहद्दीनच्या मदतीला आले आहेत.
१३) सदाफ दुर्रानी -
सबस्क्राईबर - N\A
मजकूर - भारतीय लष्कराच्या मोठ्या पराभवानंतर मोदींची काश्मीरला तातडीची भेट
१४) मियान इम्रान अहमद -
सबस्क्राईबर - ३६०००
मजकूर - बिपीन रावत यांच्या खुनामध्ये युएसएचा कसा हात आहे याचा चीनकडून खुलासा
१५) नजम-उल्-हसन ऑफिशियल -
सबस्क्राईबर - ८.५४ लाख
मजकूर -
बिपिन रावत हेलिकॉप्टरचा अपघात नव्हता, हे भारतीय मुस्लिमांविरुद्ध भाजप आणि आरएसएसचे षडयंत्र होते.