Pfizer: कोरोनावरची गोळी येणार? WHO ची महत्त्वाची शिफारस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid 19 Tablet
Pfizer: कोरोनावरची गोळी येणार? WHO ची महत्त्वाची शिफारस

Pfizer: कोरोनावरची गोळी येणार? WHO ची महत्त्वाची शिफारस

रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी तसंच सौम्य स्वरुपाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी फायझरच्या कोविड-१९ अँटिव्हायरल गोळीची शिफारत जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं एक गंभीर इशाराही दिला आहे. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणातल्या तफावतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

WHO ने म्हटलं आहे की, कोविड-१९ प्रतिबंधक लसींच्या वाटपामध्ये असलेल्या असमानतेमुळे अल्प आणि मध्यम उत्त्पन्न असलेली राष्ट्रे मागे ढकलली जातील. त्यासोबतच त्यांनी फायझर कंपनीच्या निर्माट्रेल्विर आणि रिटोनावीरचं संयुग असलेली पॅक्स्लोव्हिड ही गोळी लसीकरण न झालेल्या, वयस्क आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी एक चांगला पर्याय आहे.

पॅक्स्लोव्हिडला पर्याय म्हणून रेमडेसिविरची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. या गोळीमुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रमाणात घट होईल, तसंच यामुळे उपचारही सुलभ होतील. ३,१०० रुग्णांवर या गोळीच्या दोन चाचण्या झाल्या असून त्यातून असं लक्षात आलं आहे की पॅक्स्लोव्हिडमुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा धोका ८५ टक्क्यांनी कमी होत आहे.

Web Title: Who Strongly Recommends Pfizer Covid 19 Pill For At Risk Patients

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top