भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 जानेवारी 2020

अध्यक्षपदासाठीचे निकष
भाजपच्या घटनेनुसार भाजपच्या राज्य शाखांपैकी किमान २० शाखांतील प्रदेशाध्यक्षांनी ठरविलेल्या नेत्याची शिफारस नवे अध्यक्ष म्हणून करायची असते. संबंधित नेता किमान १५ वर्षे पक्षाचा सक्रिय सदस्य असावा लागतो. त्यानंतर पक्षाच्या संसदीय मंडळातील बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होते व नव्या अध्यक्षांची निवड जाहीर होते. भाजपच्या ५० टक्के प्रदेशाध्यक्षांची निवड होणे ही राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी अनिवार्य असते.

नवी दिल्ली - केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते जगत प्रकाश नड्डा यांची पुढील आठवड्यात अधिकृतपणे नियुक्ती करण्यात येईल. भाजपच्या राज्य शाखांच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अमित शहा यांची जागा नड्डा घेतील. २० ते २२ जानेवारी दरम्यान पंतप्रधानांच्या सोयीनुसार हा बिनविरोध सोहळा पार पडेल. राज्यसभा सदस्य नड्डा हे सध्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीमुळे शहा यांना गृहमंत्रालयाकडे लक्ष व वेळ देण्यास पुरेशी सवड मिळत नाही, त्यामुळे भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने नड्डा यांच्याकडे पक्षाध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला. ८ फेब्रुवारीला  होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुका शहा यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्याचा आग्रह दिल्लीतील काही नेत्यांनी धरला असला, तरी दिल्लीत ‘आप’च्या प्रचंड आव्हानासमोर भाजपने ध्रुवीकरणाचे कार्ड खेळले तरी पक्षाला फारशी आशा नसल्याचे उमगल्यावर पक्षनेतृत्वाने नड्डा यांच्याकडे सूत्रे देण्याचे ठरविल्याचे समजते. त्यानंतर बिहार व उत्तर प्रदेशच्या निवडणुकाही नड्डा यांच्याच अध्यक्षतेखाली भाजप लढवेल हेही स्पष्ट आहे.

निर्भया प्रकरण : नराधमांची फाशी लांबणीवर?

नड्डा यांना मोदी व शहा दोघांचाही पाठिंबा असल्याने त्यांची बिनविरोध नियुक्ती काही आडकाठी न येता होणार हेही स्पष्ट झाले आहे. भाजपच्या राज्य निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रविवारी (ता. १९) नड्डा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करतील. त्यानंतर २० जानेवारी (पौष एकादशी) किंवा २२ तारखेला (मेरू त्रयोदशी) नड्डा यांची अधिकृत नियुक्ती केल्याचे पंतप्रधान व शहा यांच्या उपस्थितीत जाहीर केले जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will be considered as the national president of BJP