Uttar Pradesh: मुस्लिम मतांचा फायदा कोणाला होणार? उत्तर प्रदेशात ‘बसप’ भाजपला साह्यकारी ठरण्याचा अंदाज

Uttar Pradesh: पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ येत असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मतांचा प्रभाव किती पडणार, या मुद्द्याची चर्चा अधिक गांभीर्याने होत आहे.
Uttar Pradesh
Uttar PradeshEsakal

लखनौ: पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ येत असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मतांचा प्रभाव किती पडणार, या मुद्द्याची चर्चा अधिक गांभीर्याने होत आहे. विशेषत: रामपूर, मुरादाबाद, संभल याशिवाय पश्‍चिम उत्तर प्रदेशमधील इतर मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष असेल. मुस्लिम मतांचे पुन्हा एकदा विभाजन करून भाजप एकहाती सत्ता मिळविणार का, याबाबत उत्सुकता आहे.

दिल्लीत सरकार स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात ८० मतदारसंघ मिळून १५.३४ कोटी पात्र मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने ६२ तर, त्यांचा मित्र पक्ष असलेल्या अपना दलाने दोन जागा जिंकून सप-बसप-काँग्रेसला धूळ चारली होती. त्यातल्या त्यात बसपला १० जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पक्षाला पाच आणि काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.

Uttar Pradesh
QS World: जेएनयू देशातील सर्वोत्तम विद्यापीठ; जगातील टॉप-20 मध्ये मिळाले स्थान; IIT कोणत्या क्रमांकावर?

मुस्लिम मतांची अधिक टक्केवारी असलेल्या राज्याच्या पश्‍चिम भागात त्यांना चांगले यश मिळाले होते. यंदा मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत. मागीलवेळी आघाडी करून लढलेल्या ‘बसप’ने यंदा स्वबळाची परीक्षा पाहण्याचा निर्णय घेतला आहे, तर पश्‍चिम भागात प्रभाव असलेल्या राष्ट्रीय लोक दलाने भाजपला साथ दिली आहे. सप आणि काँग्रेस मात्र एकत्रितपणे लढत आहेत.

Uttar Pradesh
लक्षवेधी लढत : मंडला मतदारसंघात भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान; केंद्रीय मंत्र्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काँग्रेसला पणाला लावावं लागणार कसब

पहिल्या टप्प्यात मतदान असलेल्या आठ मतदारसंघांमध्ये सरासरी ३० टक्के मुस्लिम मतदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत या भागातील एकूण मतदारसंघांपैकी चार ठिकाणी ‘बसप’ने विजय मिळविला होता, तर तीन ठिकाणी ‘सप’ला यश मिळाले होते. मुझफ्फरनगर, कैराना, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि अलिगड या ठिकाणी भाजपला मतविभाजनाचा फायदा झाला होता. यंदा मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान झाले तरच सप व काँग्रेसला यश मिळेल, अशी परिस्थिती आहे.

Uttar Pradesh
School Bus Accident: स्कूल बस उलटल्याने भीषण अपघात, पाच मुलांचा मृत्यू, तर १५ जण जखमी

सप-काँग्रेसला चिंता

मागील तीन ते चार वर्षांपासून मुस्लिमांच्या प्रश्‍नांवर समाजवादी पक्षाने आवाज उठविलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर हे मतदार नाराज आहेत. स्वतंत्रपणे लढणाऱ्या ‘बसप’ने अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवाराला उभे केले आहे. त्यामुळे मतविभाजन होण्याचा धोका आहे. त्यातच जाट मते भाजपच्या बाजूने जाण्याची दाट शक्यता असल्याने मागील निवडणुकीपेक्षा यंदा भाजपला अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. समाजवादी पक्षाला मात्र हा तर्क मान्य नसून मुस्लीम समाज आपल्याच बाजूने ठामपणे उभा आहे, अशी या पक्षाच्या नेत्यांची खात्री आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com