esakal | VIDEO: तमिळनाडूत का झाला सत्तापालट? जाणून घ्या कारण

बोलून बातमी शोधा

VIDEO: तमिळनाडूत का झाला सत्तापालट? जाणून घ्या कारण

VIDEO: तमिळनाडूत का झाला सत्तापालट? जाणून घ्या कारण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चेन्नई: तमिळनाडू विधानसभेमध्ये द्रमुकने विजयी झेंडा फडकावला आहे. याठिकाणी द्रमुक आघाडीला 149 हून अधिक जागांवर सरशी मिळाली आहे तर अण्णा द्रमुक आघाडीला 84 जागांवर सरशी मिळाली आहे. तमिळनाडूत आता एम के स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणार आहे, हे स्पष्ट झालं असून अण्णा द्रमुक सलग तिसऱ्यांदा पक्ष स्थापन करण्यात अयशस्वी ठरला आहे. तमिळनाडूमध्ये 234 जागांसाठी विधानसभेची निवडणूक झाली. आज तब्बल 4,218 उमेदवारांचं भविष्य निश्चित झालं. राज्यात सत्ता गाठण्यासाठी 118 जागांचा टप्पा गाठणे महत्त्वाचे होतं. एम करुणानिधी आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर होणारी ही पहिलीच विधानसभेची निवडणूक होती. अण्णा द्रमुक (AIADMK) आणि द्रमुक (DMK) हे या ठिकाणी लढणारे प्रमुख पक्ष आहेत. या राज्यात का पालटली सत्तेची समीकरणं? याविषयीच आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत...