कॅनडाला जाण्यासाठी तब्बल चार देशांना का घालावा लागतोय वळसा?

Aeroplane
Aeroplane

नवी दिल्ली : सर्वप्रथम भारताहून दुबईला विमानप्रवास, त्यानंतर बार्सिलोनात पुढील विमान पकडण्यासाठी नऊ तासांची प्रतिक्षा, तिथून मेक्सिकोला जाणाऱ्या विमानासाठी दोन तास, मेक्सिकोत आरटीपीसीआर चाचणीसाठी दोन दिवसांचा मुक्काम आणि अंतिमत: व्हॅनकुव्हरला जाणाऱ्या विमानाने कॅनडा गाठणं, लॅरिना कुमार या १९ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीला भारतातून कॅनडाला शिक्षणासाठी जाण्यासाठी चार देशांचा वळसा घालावा लागला.
लॅरिना कुमार कॅनडातील एमिली कार विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. एरवी भारतातून कॅनडाला जाण्यासाठी दीड लाख रुपये लागतात. लरेना कुमारला आपल्या पहिल्याच विमानप्रवासासाठी मात्र पाच लाख रुपये खर्चावे लागले. शिवाय, निर्बंधांमुळे आईला सोबत न घेता आल्याने तिला एकट्याने कॅनडा गाठावे लागले. याशिवाय, चार वेगवेगळ्या देशांतून प्रवास करताना कोणत्याही क्षणी नियम बदलण्याची टांगती तलवार होतीच.

Aeroplane
राज ठाकरे काय म्हणाले ? महत्त्वाचे सहा मुद्दे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कॅनडाने भारतातून थेट विमानप्रवासावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे, कुमारसारख्या अनेक विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. कॅनडातील विद्यापीठांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातून अशा प्रकारे विमाने बदलून कॅनडाला जावे लागत आहे. त्यासाठी, त्रयस्थ देशाकडून कोरानाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्रही घ्यावे लागते. शिवाय, हा देश कॅनडाने चाचणीसाठी मंजुरी दिलेल्या देशांच्या यादीतही असावा लागतो. भारतातील आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र गृहीत धरण्याचा मुद्दा भारताने कॅनडाकडे उपस्थित करण्याची या विद्यार्थी - पालकांची मागणी आहे. सध्याची प्रक्रिया केवळ गैरसोयीचीच नव्हे तर अत्यंत खर्चिक असल्याचाही त्यांचा दावा आहे.

Aeroplane
फेसबुकची मोठी कारवाई, द्वेष पसरवणाऱ्या 3 कोटी पोस्ट हटवल्या

कॅनडाचे २१ सप्टेंबरपर्यंत निर्बंध
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ब्रिटन, फ्रान्ससह अन्य युरोपीय देशांनीही भारतावर घातलेले प्रवासाचे निर्बंध शिथील केले आहेत. मात्र, कॅनडाने भारतीय विमानांवरील बंदी २१ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. गेल्या महिन्यात भारताचे कॅनडातील उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी दोन्ही देशांतील विमानसेवा पुन्हा सुरु करण्यासाठी एअर इंडियाच्या प्रतिनिधींची टोरोंटोमध्ये भेट घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com