प्रियांका गांधी म्हणाल्या, त्यांनाच निवडून द्या!

पीटीआय
Thursday, 19 December 2019

भाजपकडून अपप्रचार - माकप
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पक्षाने कधीही पाठिंबा दिला नव्हता, असे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून (माकप) आज स्पष्ट करण्यात आले. भाजपकडून जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरविली जात असल्याचा आरोपही माकपने केला आहे.

पाकूर (झारखंड) - सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून, त्यांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज ऐकणाऱ्या, त्यांना समजून घेणाऱ्या सरकारलाच झारखंडमधील जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाद्रा यांनी आज केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेस पक्षाच्या येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना प्रियांका म्हणाल्या, की आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेला अपयश आले आहे. त्यानंतरही केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्वाचा कायदा आणला आहे. या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी देशभरातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीमार केला जात आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेणारे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारे, महिलांना सुरक्षा प्रदान करणारे आणि तुमच्या संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या सरकारलाच राज्यातील जनतेने निवडून द्यावे, असे प्रियांका म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why do Priyanka Gandhi say let them choose