Gulam Nabi Azad| गुलाम नबी आझादांच्या नाराजीची ४ कारणं; जाणून घ्या, Inside Story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

why Ghulam Nabi Azad resign from Congress

गुलाम नबी आझादांच्या नाराजीची ४ कारणं; जाणून घ्या, Inside Story

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षातल्या सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी पक्षावर नाराजी दर्शवली आहे. या नाराजीमागे ४ कारणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.(why Ghulam Nabi Azad resign from Congress )

हेही वाचा: Gulam Nabi Azad: काँग्रेसच्या अडचणीत भर; ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम

अनेक मुद्यांवर गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसमधील मतभेद समोर आले आहेत. पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक व अन्य मुद्यांवर आझाद यांनी काँग्रेसचा विरोध केलेला आहे. गुलाम नबी आझाद जी २३ गटामधील सामील आहेत. जे पक्षात मोठ्या परिवर्तनाची मागणी करतात. आज आझाद यांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्याने काँग्रेसशी असणाऱ्या नात्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पहिलं कारण

त्यांचा अनुभव आणि दर्जा पाहता आझाद यांना स्वतःला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करायचे आहे. जेव्हा-जेव्हा निवडणूक असते तेव्हा आझाद यांना स्वतःला राज्यातील सर्वात उच्चा नेता म्हणून ड्रायव्हिंग सीट हवी असते.

हेही वाचा: गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार घोषणेमुळे काँग्रेसमध्ये वाद!

दुसरे कारण

जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या नव्या नियुक्त्या केल्या आहेत. काश्मीर प्रदेशातील ज्येष्ठ नेते तारिक हमीद कारा यांच्याकडे राजकीय घडामोडी समितीची जबाबदरी देण्यात आली. वादग्रस्त नेत्याच्या नेतृत्वाखालील समितीत बसवण्यात आल्याने आझादही वैतागले असल्यीच माहिती समोर आली.

तिसरा कारण

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य युनिटची पुनर्रचना देखील केली आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांची जम्मू-काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा हा निर्णय निवडणुकीच्या दृष्टीने विशेष मानला जात होता. मात्र, गुलाम नबी आझाद यांनी जबाबदारी नाकारत पदाचा राजीनामा दिला.

आझाद यांच्या मते सोनिया गांधींना सल्ला देणाऱ्या राजकीय घडामोडी समितीचा तुम्ही महत्त्वाचा भाग असाल, तर राज्यात अशा नव्या समिती स्थापन करण्याती कोणतीही गरज नव्हती. अशा समिती स्थापन केल्याने त्यांच्या पदाचा मान कमी होतो. उर्वरित समिती सदस्यांची नियुक्ती करताना गुलाम नबी आझाद यांचा सल्ला घेण्यात आला नाही. त्यामुळे अनेक राज्यस्तरीय नेतेही नाराज आहेत.

चौथे कारण

आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं राजीनामा पत्र पाठवलं आहे. सोनिया गांधींना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी लिहिलं आहे की, "अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे." तसंच भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढावी, असा सल्लाही गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे.

तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधी यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून, विशेषत: 2013 नंतर तुम्ही राहुल यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी पक्षातील चर्चेची संपूर्ण ब्लू प्रिंटच उद्ध्वस्त करुन टाकली आहे. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आलं. तर अननुभवी नेते पक्षाचा कारभार पाहू लागले. अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Why Ghulam Nabi Azad Resign From Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..