makar sankranti khichdi
sakal
रामनगरी अयोध्येत यावर्षी १५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे. या मंगल दिनी श्री राम जन्मभूमी मंदिरात विराजमान असलेल्या प्रभू रामललाला विशेष पूजा करून खिचडीचा नैवेद्य अर्पण केला जाईल. तसेच तिळगूळ आणि इतर सात्विक पदार्थांचा नैवेद्यही प्रभूंच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे.