Bangalore Water Crisis : बंगळुरूमध्ये कार धुणे, झाडांना पाणी घालण्यावर बंदी! देशाच्या 'आयटी हब'मध्ये का होतेय पाणी टंचाई

Bangalore Water Crisis : भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेलं शहर बेंगळुरू सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे.
Bangalore Water Crisis
Bangalore Water Crisis

Bangalore Water Crisis Latest News : भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेलं शहर बेंगळुरू सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. यामुळ शहरात कार धुणे, बगेतील झाडांना पाणी देण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघण केल्यास मोठा दंड देखील लावण्यात येणार आहे. या पाणी टंचाईमुळे बेंगळुरू शहराची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. तसेच हा मुद्दा आगामी लोकसभा निवडणुकीत हा पाणी प्रश्न मोठा मुद्दा बनू शकतो.

जवळपास दीड कोटी लोकसंख्या असलेल्या कर्नाटकच्या राजधानीच्या शहरासाठी कावेरी नदीमधून १४५ कोटी लीटर पाणी ९५ किलोमीटर अंतराहून आणलं जातं. समुद्र सपाटीपासून ३००० फूट उंचीवर असलेल्या या शहराला आवश्यक ६० कोटी लीटर पाणी बोरवेलच्या माध्यमातून उपलब्ध केलं जातं.

बंगळुरू मध्ये इतकी भीषण पाणी टंचाई असण्याचे कारण शहरातील खाली जाणारी भूजल पातळी आहे. नौऋत्य मॉन्सून आणि इशान्य मॉन्सून पाऊस कमी झाल्याने शहरातील भूजल पातळी खूपच खाली गेली आहे.

Bangalore Water Crisis
Amruta Fadnavis New Song : 'देवाधी देवा...' महाशिवरात्रीच्या निमित्तानं अमृता फडणवीसांचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला! शंकर महादेवनचीही साथ

बंगळुरू पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका ११० गावांना बसत आहे. या गावांचा नुकतेच बंगळुरू शहरात समावेश करम्यात आला आहे. तसेच दक्षिण बंगळुरू च्या कॉलन्यांमध्ये आणि बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना एक वेगळी जीवनशैली स्वीकारण्यासाठी भाग पाडलं जात आहे.

भारतातील सर्वात थंड शहरांपैकी एक असलेल्या बंगळुरू शहरात हवामान विभागाने तापमान वाढ आणि उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना जास्तच बसणार आहेत.

Bangalore Water Crisis
Sudha Murthy Video Viral: सुधा मूर्तींनी हात जोडून दिला होता खासदारकीला नकार, राजकारणाचे नारायण मूर्ती यांना का आहे वावडे ? Viral Video

पाणी टंचाई का झाली?

बीबीसी हिंदींच्या रिपोर्टनुसार, या पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका हा २००७ मध्ये बंगळुरू शहरात समील झालेल्या गावांना बसला आहे. या पैकी बऱ्याच गावांना कावेरी पेयजल योजनेच्या फेज ४ अंतर्गत पाणी मिळतं.

बीबीसीली बेंगळुरूच्या व्हाइटफील्ड भागात राहणाऱ्या एका नागरिकांने माहिती दिली की, कावेरी फेज-४ प्रकल्पांतर्गत महादेवपुराला ३.५ कोटी लिटर पाणी मिळतं, पण एका अंदाजानुसार २०१३ पासून आतापर्यंत महादेवपुरा येथे दररोज १००० नवीन लोक राहायला येत आहेत.

या नवीन येणाऱ्या लोकांसाठी बहुमजली इमारती बांधल्या जातात, पण पाण्याची पुरवठा त्या प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्यासाठी टँकर्सनी पाणी मागवलं जात आहे. तसेच पावसाच्या कमतरतेमुळे बंगळुरू शहरातील भूजल स्तर खूप खाली गेला आहे. तसेच शहरातील बहुतेक तलाव देखील कोरडे पडले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com