life insurance
sakal
इन्शुरन्स आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. आयुष्य, आरोग्य, वाहन किंवा मालमत्ता, कोणतीही गोष्ट असो, आजच्या काळात विमा ही एक महत्त्वाची आर्थिक गरज बनली आहे. भविष्यात अचानक कोणतीही अडचण निर्माण झाल्यास कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने अनेक लोक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतात.
मात्र, पॉलिसी घेताना अनेक जण वैद्यकीय तपासणीकडे दुर्लक्ष करतात. काही लोक 'आपल्याला कोणताही आजार नाही' असे समजून मेडिकल टेस्ट टाळतात, तर काहींना प्रीमियम वाढेल किंवा पॉलिसी मिळण्यात अडचण येईल अशी भीती वाटते.