esakal | वहिणी अन् दीराच्या प्रेमसंबंधाने सगळचं संपलं...
sakal

बोलून बातमी शोधा

wife and brother killed for love at bihar

एका पंचेचाळीस वर्षीय महिलेचे वीस वर्षाच्या दीरासोबत प्रेमसंबंध जुळले होते.

वहिणी अन् दीराच्या प्रेमसंबंधाने सगळचं संपलं...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

गया (बिहार): एका पंचेचाळीस वर्षीय महिलेचे वीस वर्षाच्या दीरासोबत प्रेमसंबंध जुळले होते. याबाबतची माहिती नवऱयाला समजल्यानंतर त्याने पत्नी व भावाचा खून करून दोघांचे मृतदेह झाडाला लटकावल्याने एकच खळबळ उडाली.

लालती देवी महिलेचे तर दीराचे नाव कुंदन ऊर्फ टेनी मांझी आहे. दोघांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पती टुली मांझी आणि सासऱ्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी व दीराच्या प्रेमसंबंधाबद्दल टुलीला संशय होता. दोघांच्या प्रेमसंबंधामुळे टुली याने पत्नी व भावाचा खून केला व दोघांचे मृतदेह घरापासून जवळ असलेल्या झाडाला लटकावले. याबाबतची माहिती समजल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

ललिता देवी व कुंदन हे एक आठवड्यापूर्वी पळून गेले होते. पत्नी आणि भावाचे प्रेमसंबंध समल्यानंतर टुली मांझी याने दोघांची हत्या केली व मृतदेह झाडाला लटकावले. एकाच वेळी दोघांचे मृतदेह सापडल्याने गावामध्ये खळबळ उडाली होती. एकाच वेळी दोघांचे मृतदेह सापडल्याने परिसरातील नागरिकही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणली. याबाबचा पुढील तपास पोलिस करत आहेत.