Video: नवऱ्याला प्रेयसीसोबत रंगेहात पकडलं अन्...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

प्रेयसी घरामध्ये गेली अन् ही माहिती पत्नीच्या मोबाईलवर गेली. पत्नीने प्रेयसी व पतीला रंगेहात पकडले.

हैदराबादः पतीचा नवऱयावर संशय होता. पत्नीने घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला आणि मोबाईलवर त्याचा माहिती ठेवली. प्रेयसी घरामध्ये गेली अन् ही माहिती पत्नीच्या मोबाईलवर गेली. पत्नीने प्रेयसी व पतीला रंगेहात पकडले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पत्नी व तिच्या नातेवाईकांनी दोघांना रंगेहात पकडल्यानंतर मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाना यांचे तीन वर्षापूर्वी लक्ष्मणसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांमध्येच लक्ष्मणचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. दोघे एकत्रही राहू लागले. सुजाना यांना पतीवर संशय होता. यामुळे त्यांनी पतीला रंगेहाथ पकडण्यासाठी योजना आखली. घरामध्ये छुपा सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता. पतीला याबाबत काहीच माहिती नव्हती. पत्नी घरामध्ये नसताना पती व प्रेयसी एकत्र आल्याचे मोबाईलमध्ये दिसले. यामुळे सुजाना यांनी नातेवाईकांना सोबत घेत घराचा दरवाजा ठोठावला. शिवाय, अन्य एका व्यक्तीला मोबाईलवर शुटींग करायला लावले. दरवाजा उघडल्यानंतर दोघे रंगेहात पकडले गेले. दोघांना बेदम मारहाण करण्यात आली व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, पती व प्रेयसीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife catches husband and his lover red handed and attacks them at telangana