पती आणि प्रेयसीला पकडले रंगेहात; काढला व्हिडिओ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

पतीला रंगेहात पकडण्यासाठी तिने सुरवात केली. पती आणि प्रेयसी मोटीरात असताना पत्नीने व्हिडिओ शुटिंग करून रंगेहात पकडले.

नोएडा: पतीच्या प्रेमप्रकरणाची माहिती पत्नीला समजली होती. पतीला रंगेहात पकडण्यासाठी तिने सुरवात केली. पती आणि प्रेयसी मोटीरात असताना पत्नीने व्हिडिओ शुटिंग करून रंगेहात पकडल्याची घटना 15 जुलै रोजी येथे घडली आहे.

एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनीयर या पदावर युवक काम करत आहे. ऑफिसमध्ये त्याची एका युवतीसोबत ओळख झाली व ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. युवकाच्या पत्नीला याबाबत संशय आला होता. त्यामुळे तिने दोघांना रंगेहात पकडण्याचे ठरवले. पती व त्याची प्रेयसी मोटारीमधून फिरत असल्याची माहिती पत्नीला मिळाली. दोघांना पकडण्यासाठी ती मोटारीजवळ गेली. मोटारीच्या समोर जाऊन तिने व्हिडीओ शुटिंग काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रेयसीने मोटार सुरू करुन धडक दिली. मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पत्नीने सेक्टर-49च्या पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पती-पत्नीचा जानेवारी 2017 मध्ये विवाह झाला आहे. विवाहानंतर काही दिवसातच पतीचे विवाहबाह्य संबंधाबद्दल संशय येऊ लागला. याबद्दलची माहिती मिळवण्याचा तिने प्रयत्न केला. त्यावेळी ऑफिसमधील एका युवतीसोबत पतीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोघांना रंगेहात पकडण्याचे तिने ठरवले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife caught husband and girlfriend together in car at noida