पतीवर गुन्हेगारी कृत्याचे सिद्ध न होणारे आरोप करणे क्रूरताच - हायकोर्ट | Court | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court

पतीवर गुन्हेगारी कृत्याचे सिद्ध न होणारे आरोप करणे क्रूरताच - हायकोर्ट

नवी दिल्ली: "पत्नीने पतीवर आणि त्याच्या आई-वडिलांवर गुन्हेगारी कृत्याचे (Criminal Conduct) गंभीर आरोप केले आणि सत्र न्यायालयात (Trial court) ते आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, तर ती एक प्रकारची क्रूरताच आहे" असे दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीत म्हटले आहे.

न्यायाधीश विपिन संघी आणि न्यायाधीश जसमीत सिंह यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाने नवऱ्याला जामीन मंजूर करण्याचा निर्णय कायम ठेवला. पत्नीने कौटुंबिक न्यायालय कायद्याच्या कलम १९ अंतर्गत केलेली याचिका फेटाळून लावली.

loading image
go to top