
पत्नीने प्रियकराच्या संगनमताने पतीची हत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. उत्तरप्रदेशातील अलिगडच्या बारला शहरात असाच एक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या पती गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पती दिल्लीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो कधी आठवड्यातून एकदा तर कधी दहा दिवसांतून एकदा घरी येत असे. पत्नीचे तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. पण अडथळा ठरत असल्याने तिने त्याचा काढायचे ठरवले.