
नवी दिल्ली : ‘‘चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन याला त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याप्रमाणे बंगळूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना अटक करणार का?’’ अशी विचारणा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.