Fuel Prices : लोकसभा निवडणुकीपूर्वी इंधनाचे दर कमी होणार? पेट्रोलियम मंत्री म्हणाले...

fuel prices
fuel prices


नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीपूर्वी इंधनाचे दर कमी करण्याच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी उत्तर दिले. याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार इंधनाचे दर कमी करणार हा गैरसमज आहे, हा दावा प्रसारमाध्यमांनी केला असून त्यात तथ्य नाही.

fuel prices
Jalgaon Raid : ''कामगार आमच्या पाठीशी, त्यांना आम्ही...'', ED च्या कारवाईनंतर मनीष जैन यांची प्रतिक्रिया चर्चेत

केंद्रीय गृहनिर्माण, शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम तथा नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय किंमती, वाहतूक खर्च, शुद्धीकरण खर्च आणि कर यासारख्या अनेक घटकांच्या आधारावर इंधनाच्या किमती निर्धारित केल्या जातात. ते म्हणाले की, देशातील इंधनाचे दर सरकार या घटकांवरून निश्चित करते.

fuel prices
Eknath Shinde Vs Ramdas Kadam : रामदास कदमांवर एकनाथ शिंदे नाराज ; बैठकीत नक्की काय घडलं ?

कोरोना महामारीनंतर 2022 मध्ये तेलाच्या किंमती वाढल्याचा संदर्भ देत हरदीप सिंग पुरी म्हणाले की, भारताने तेल पुरवठा करणाऱ्या देशांना किंमती कमी करण्यास सांगितले नाही. उलट सरकारने इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात केली आहे.

"याशिवाय, भाजपशासित राज्यांमधील सरकारने इंधनावरील करात 8 रुपयांवरून 11 रुपयांपर्यंत कपात केल्याचं पुरी यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com