कोरोना संपताच CAA कायदा लागू करणार; शहांचे मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

Video : कोरोना संपताच CAA कायदा लागू करणार; शहांचे मोठं विधान

कोलकाता : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मोठे विधान केले असून, कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करू असे मोठे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले असून त्यावेळी ते बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायदा हे वास्तव असून तृणमूल काँग्रेस त्याबाबत काहीही करू शकत नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ममतांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दीदींच्या राजवटीत भ्रष्टाचार, सिंडिकेट आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. त्यामुळे ममता दीदींनी असा विचार करू नये की, भाजप पलटवार करणार नाही.

तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत आहे की, नागरिकत्व कायदा कधीही अस्तित्वात येणार नाही. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, कोविड महामारी संपल्यावर आम्ही CAA लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण CAA हे वास्तव आहे, त्याची अंमलबजावणी केली जाईल असे शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अभेद्य करणे हे मोदी सरकारचे मूळ लक्ष्य असून, आम्ही आमच्या सैनिकांना सीमेवरील सुरक्षेसाठी जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम करत आहोत. आज सतलज, कावेरी आणि नर्मदा फ्लोटिंग बीओपी राष्ट्राला समर्पित असल्याचेही यावेळी शहा यांनी सांगितले.

सैनिकांच्या कुटुंबासाठी कोणतीही कसर सोडणार नाही

पुढे बोलताना शहा म्हणाले की, सीमाभागात तैनात असलेल्या देशाच्या सैनिकांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल, यासाठी काय करता येईल यावर काम करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तसेच सैनिकांच्या कुटुंबीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडणार नसल्याचेही यावेळी शहा यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Will Implement Caa After Corona Pandemic Over Home Minister Amit Shah In West Bengal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :West BengalAmit ShahCAA
go to top