BLOG: ड्रोन हल्ल्याला भारत AIR STRIKE ने उत्तर देईल?

एअर फोर्स तळावर 'राफेल'च्या हँगरवर अशा प्रकारे हल्ला झाला तर?
rafale jet.
rafale jet.

मागच्या काही महिन्यांपासून पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर शांतता आहे. पाकिस्तान (pakistan) शस्त्रसंधी कराराचे पालन करत असल्यामुळे गोळीबार आणि दहशतवाद्यांची घुसखोरी (terrorist infiltration) या दोन्ही गोष्टी थांबल्या आहेत. पण आजची सकाळ एका वेगळ्या बातमीने झाली. त्यामुळे पुढच्या काही दिवसात भारत-पाकिस्तान संबंधांवर (india-pak relation) याचे गंभीर पडसाद उमटू शकतात. सध्या हळूहळू पूर्वपदावर येत असलेले संबंध पुन्हा बिघडू शकतात. आज जम्मूमधील इंडियन एअर फोर्सच्या स्टेशनवर बॉम्ब हल्ला झाला. रात्री दीडच्या सुमारास ड्रोनद्वारे हा हल्ला करण्यात आला. (Will india answers jammu air force station drone attack with air strike)

या बॉम्ब हल्ल्यात एअर फोर्सच्या इमारतीच्या छताचे नुकसान झाले आहे, तर दुसऱ्या बॉम्बचा मोकळ्या जागेत स्फोट झाला. या हल्ल्यात जीवतहानी झालेली नाही तसेच एअर फोर्सच्या कुठल्याही संपत्तीचे नुकसान झालेले नाही. पण दहशतवाद्यांनी अशा प्रकारे ड्रोनद्वारे सैन्य दलाच्या तळाला लक्ष्य करणे, ही अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा एक मोठा धोका आहे. भारतात पहिल्यांदाच एका लष्करी संस्थेच्या तळावर असा ड्रोन हल्ला झाला आहे. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात येमेनच्या हौथी बंडखोरांनी अशाच प्रकारे हल्ला करुन, सौदी अरेबियाच्या तेल प्रकल्पांना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी दहशतवाद्यांनी ड्रोनव्दारे नागरीप्रकल्पांना लक्ष्य करण्याची ही जगातील पहिली घटना होती.

rafale jet.
मुंबई: कॉलेजचा ऑनलाईन वर्ग सुरु असताना लागला पॉर्न व्हिडीओ

आता असाच हल्ला भारतात झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास होऊन त्यावर भारत सरकारची भूमिका महत्त्वाची असणार आहे. जम्मूमधील ज्या एअर फोर्स स्टेशनवर हल्ला झाला, तिथून भारत-पाकिस्तान सीमा १४ किमी अंतरावर आहे. यापूर्वी ड्रोन्सचा वापर करुन भारताच्या हद्दीत १२ किमी आतापर्यंत शस्त्रास्त्र टाकण्यात आली होती. इंडिया टुडेनं आपल्या वृत्तात हे म्हटलं आहे. ज्या ठिकाणी हे बॉम्ब टाकण्यात आले, तिथे उभ्या असलेल्या हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करण्याचा प्लान होता, असं सूत्रांनी सांगितलं. उद्या एअर फोर्स तळावर 'राफेल'च्या हँगरवर अशा प्रकारे हल्ला झाला तर? त्यामुळे ही साधीसुधी घटना नाहीय. बॉम्ब स्फोटाची तीव्रता कमी दिसत, असली तरी त्यामागे मोठा संदेश देण्याचा उद्देश आहे.

rafale jet.
चिमुकल्या तुलसीची शिक्षणासाठी धडपड; फळं विकून पूर्ण केलं स्वप्न

हा हल्ला म्हणजे सुरक्षेच्या आघाडीवर आपल्या कमतरता सुद्धा अधोरेखित करतो. एअर फोर्स स्टेशनच्या ठिकाणी एक ड्रोन येऊन अशा प्रकारे बॉम्बफेक कशी करु शकते? आपली रडार आणि अन्य यंत्रणांच्या रेंजमध्ये ते कसे आले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या जम्मू-काश्मीरचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंतप्रधानांनी नुकतीच जम्मू-काश्मीरमधील पक्षांची सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यावेळी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा चा मुद्दा चर्चेत आला. या हल्ल्यातून पाक पृरस्कृत दहशतवादी संघटनांचा संदेश देण्याचा इरादा दिसून येतो.

ड्रोनचे तंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती लागणे एक गंभीर धोका आहे. उद्या हे दहशतवादी एखाद्या नागरी विमानतळावर हल्ला करु शकतात. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवतहानी संभवते. यापूर्वी २०१६ साली पाक पृरस्कृत दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला केला होता. त्यावेळी सुदैवाने हे हल्लेखोर तिथे पार्क केलेल्या फायटर विमानांपर्यंत पोहोचू शकले नव्हते. या हल्ल्याच्या आठवडाभरआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी अफगाणिस्तान मार्गे भारतात येत असताना, वाट वळवून नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर आठवड्याभरातच हा हल्ला झाला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या तपास पथकाला भारतात येऊ दिले होते. पण आता या ड्रोन हल्ल्याच्या कटाचे धागेदोर पाकिस्तानपर्यंत पोहोचले तर मोदी सरकारची भूमिका काय असणार? हे महत्त्वाचे आहे. कारण एअर फोर्सच्या तळावर हल्ला ही साधीसुधी बाब नाही. उद्या हे हल्लेखोर त्यापुढची मजल गाठू शकतात. त्यामुळे सखोल तपास करुन त्यांना कठोर शासन आवश्यकच आहे.

दहशतवादाबद्दल झीरो टॉलरन्सचं आमचं धोरण असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सतत सांगत असतात. आता जीवीतहानी आणि संपत्तीच नुकसान झाल नाहीय. पण त्या हल्लेखोरांना अद्दल घडवण्यासाठी भारताचा प्रतिहल्ला कसा असेल? घटना छोटी असली, तरी त्याचा धोका खूप मोठा आहे, त्यामुळे शत्रूवर जरब बसवण्यासाठी एअर स्ट्राइक सारखा मोठं पाऊल उचललं पाहिजे. कारण झीरो टॉलरन्स म्हणजे एकदम झीरोचं हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com