शशिकला होणार तमिळनाडूच्या मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची जागा शशिकला घेणार का?, असे अण्णा द्रमुकचे एका ज्येष्ठ नेत्याला विचारले असता "हे सर्व तुमचे अंदाज व कल्पना असल्यांचे सांगून या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले.

चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शशिकला नटराजन यांची निवड आज (रविवार) झालेल्या पक्षाच्या बैठकीत निश्चित झाली. सध्याचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी राजीनामा दिला असून, शशिकला यांना विधिमंडळाच्या नेत्या म्हणून निवडण्यात आले आहे.

अण्णा द्रमुक पक्षाच्या अध्यक्षा जे. जयललिता यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते ओ. पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रीपदी तर पक्षाच्या सरचिटणीसपदी जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांची बहुमताने निवड झाली होती. शशिकला यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी पक्षाच्या आमदारांची मागणी होती. अखेर आज झालेल्या पक्ष बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला गेला. पनीरसेल्वम यांनीच शशिकला यांची विधिमंडळ नेतेपदासाठी शिफारस केली. याला सर्व आमदारांनी मान्यता दिल्यानंतर त्यांना विधिमंडळाच्या नेत्या म्हणून निवडण्यात आले. या निर्णयामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.

मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची जागा शशिकला घेणार का?, असे अण्णा द्रमुकचे एका ज्येष्ठ नेत्याला विचारले असता "हे सर्व तुमचे अंदाज व कल्पना असल्यांचे सांगून या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले होते. शशिकला यांनी मुख्यमंत्राच्या खुर्चीत विराजमान व्हावे, यासाठी लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनीही पाठिंबा दिला होता. पक्षनेता व राज्याचा नेतेपदी एकच व्यक्ती असावी, अशी अपेक्षा थंबीदुराई यांनी गेल्या महिन्यात व्यक्त केली होती.

Web Title: Will Sasikala Natarajan Be Chief Minister? Suspense Continues As AIADMK Meets