थंडीने गारठला उत्तर भारत; दिल्लीतील तापमान ६.० अंश सेल्सिअस

लवकरच थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे
weather
weatherweather

नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतात सध्या थंडीचा (winter) कहर सुरू आहे. डोंगराळ भगात बर्फवृष्टी आणि पाऊस सुरू असतानाच मैदानी भागातही धुके आणि थंडीची लाट सुरू झाली आहे. उत्तर भारतातील (North India frozen) अनेक शहरांमध्ये शनिवारी (ता. १८) तापमानात विक्रमी घसरण झाली. सकाळी चुरू येथे मैदानी भागात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. अमृतसरमध्ये ०.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राजधानीचे किमान तापमान ६.० अंश सेल्सिअस (Delhi 6.0 degrees Celsius) नोंदले गेले. जे या हंगामातील सर्वांत कमी तापमान आहे. यापूर्वी रविवारी किमान तापमान ६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

थंडीची (Cold) चाहूल लागली आहे. हरयाणातील नारनौल शुक्रवारी सर्वांत थंड होते. प्रदेशाचे किमान तापमान ३.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर कमाल तापमान १८.४ अंश सेल्सिअस होते. गुरुवारच्या तुलनेत किमान तापमानात ३.२ अंश सेल्सिअसने तर कमाल तापमानात ०.८ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. ३ ते ४ दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

weather
हनिमूनसाठी भेट द्या महाराष्ट्रातील या ठिकाणांना

लवकरच थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सकाळच्या वेळी राज्यातील काही भागात हलके धुकेही (North India frozen) कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात पारा सतत चढ-उतार असतो. अलिगड, मेरठ, बरेली, फतेहगड, वाराणसी, इटावा येथे किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले गेले. फतेहगढ येथे ५.२ अंश सेल्सिअस किमान तापमानासह सर्वांत थंड होते. तर मेरठमध्ये ५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे सामान्यापेक्षा २.१ अंश कमी होते.

महाराष्‍ट्रातील (maharashtra) तापमान

  • अहमदनगर ११.१

  • गोंदिया १२.०

  • बारामती १२.४

  • परभणीत १२.६

  • पुणे १२.६

  • जालना १२.६

  • सोलापूर १२.६

  • चिकलठाणा १२.८

  • जेऊर १३,

  • नांदेड १३.२

  • सातारा १३.६

  • नाशिक १३.६

  • जळगाव १४.७

  • मुंबई Scz १९.६

weather
मानलेले बहीण-भाऊच पडले एकमेकांच्या प्रेमात; अन्...

उत्तर भारतातील तापमान

  • दिल्ली ६.०

  • चुरू १.१

  • अमृतसर: ०.७

  • गंगानगर १.१

  • नारनौल ३.०

  • हिस्सार ४.०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com