बारावीत नापास झाल्यावर नैराश्य आलं, पुढं जाऊन चक्क IPS बनले

manoj sharma
manoj sharmamanoj sharma

कठीण काळातही मेहनत घेऊन अनेक विद्यार्थी पास होतात. कोणी काम करून यश गाठतो तर कोणी गरिबीवर मात करीत पास होतो. पास होणारे विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना देतात. मात्र, मनोज शर्मा हे यापैकी वेगळेच आहे. त्यांनी प्रेयसीला मदत मागितली आणि आयपीएस अधिकारी झाले. मनोज हे २००५ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस (IPS) अधिकारी आहे. (With the help of his girlfriend, the 12th failed student became an IPS officer)

मनोज शर्मा यांचा जन्म मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात झाला. बारावीपर्यंत ते सामान्य विद्यार्थी होते. तसेच बारावीत नापास झाले होते. पास होण्यासाठी कॉपी करण्याची त्यांची योजना होती. परंतु, त्यांना सेंटरवर कॉपी करता आली नाही. बारावी पास झाल्यावर टायपिंग शिकून कुठेतरी नोकरी करण्याची योजना होती, असे व्हिडिओ मुलाखतीत शर्मा यांनी सांगितले होते.

manoj sharma
यवतमाळ : लग्नसमारंभात बिर्याणीतून दोनशे जणांना विषबाधा

नापास झाल्यानंतर मनोज यांनी विचार केला की, ‘असा शक्तिशाली माणूस कोण आहे ज्याचे सर्वजण ऐकतात. आपणही त्याच्यासारखेच व्हायचे’. यानंतर ते ग्वाल्हेरला घरी परत आले. पैशांची अडचण असल्याने ग्रंथालयात ग्रंथपाल कम शिपायाचे काम केले. पैशांसाठी भावासोबत टेम्पो चालवत होते. एके दिवशी टेम्पो पकडला. टेम्पोची सुटका करण्यासाठी एसडीएमशी बोलणे आवश्यक होते. मनोज त्यांना भेटायला गेले. मात्र, त्यांनी टेम्पो सोडण्याबाबत बोलण्याऐवजी ‘तुम्ही तयारी कशी केली’ अशी विचारणा केली. मग एसडीएम हेण्याच्या स्वप्नाला बळ मिळाले.

बारावी नापास झाल्याचे भूत त्रास देत होते

मात्र, बारावी नापास झाल्याचे भूत त्रास देत होते. ज्या मुलीवर प्रेम केले तिच्याशीही मनमोकळे बोलता येत नव्हते. ‘ती बारावी नापास आहे’ असे म्हणेल याची भीती होती. यामुळे जोमाने अभ्यास करून दिल्लीत पोहोचलो. पैशांची गरज भासल्याने मोठमोठ्या घरांमधील कुत्र्यांना फिरण्याचे काम केले. एका कुत्र्याला फिरवण्यासाठी ४०० रुपये मिळत होते, असे मनोज यांनी सांगितले.

manoj sharma
४२४ व्हीआयपींची सुरक्षा बहाल; पंजाबच्या आप सरकारने बदलला निर्णय

फीशिवाय प्रवेश, मुलीचा आधार

विकास दिव्यकीर्ती नावाच्या शिक्षकाने शुल्क न घेता प्रवेश दिला. पहिल्याच प्रयत्नात प्री पास झालो. परंतु, दुसऱ्या व तिसऱ्या प्रयत्नापर्यंत प्रेमात पडलो. जिच्यावर प्रेम केले तिला ‘तू हो म्हण, तू साथ दिली तर जग जिंकू शकेल’ असे म्हटले. तिच्या होकार मिळाला आणि चौथ्या प्रयत्नात १२१ व्या क्रमांकाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली व आयपीएस झालो, असे मनोज यांनी सांगितले.

मनोज यांच्या संघर्षावर पुस्तक

मनोज यांनी ग्वाल्हेरमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर पीएचडीही पूर्ण केली आहे. अनुराग पाठक यांनी मनोज शर्मा यांच्यावर ‘12th फेल, हारा वही जो लड़ा नहीं’ हे पुस्तक लिहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com