Passport Update: आता ३ दिवसांत Passport घरी ! नियमांत बदल, ऑनलाईन भरा हा नवा फॉर्म

पासपोर्टमध्ये झालेल्या नव्या बदलाने पोसपोर्ट मिळणं सोपं आणि जलद होणार आहे. फक्त तुम्हाला यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे.
Passport New Updates: within 3 days passport will be in your home
Passport New Updates: within 3 days passport will be in your home esakal

तुम्ही जर Passport बनवण्याच्या विचारात असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अगदी उत्तम ठरेल. कारण शासनाने आता पासपोर्ट सेवांमध्ये काही बदल केले आहेत. हा पहिला बदल नसून काळानुरूप पासपोर्टमध्ये बदल होत राहातात. मात्र यावेळी पासपोर्टमध्ये झालेल्या नव्या बदलाने पोसपोर्ट मिळणं सोपं आणि जलद होणार आहे. फक्त तुम्हाला यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. (Passport New Updates: within 3 days passport will be in your home)

Passport ला अप्लाय करण्यासाठी तु्म्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्ही सहज पासपोर्ट बनवू शकता. तुम्ही पासपोर्टसाठी अप्लाय कराल त्यावेळी तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन्स येतील. यातून तुम्हाला Tatkaal Passport Option सिलेक्ट करायचं आहे.

अप्लाय केल्यानंतर तीन दिवसांत घरी येईल पासपोर्ट

तात्काल पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला ३ दिवस वाट बघावी लागेल. तीन दिवसांत Passport तुमच्या घरी येईल. तसेच पोलीस व्हेरिफिकेशनही फार लवकर होतं. ऑनलाईन उपलब्ध माहितीच्या आधारे पासपोर्ट ३ दिवसाच्या आत डिस्पॅच (Dispatch) केल्या जातं. आणि त्यानंतर त्याला पोस्टाने पोहोचण्यास नेहमीप्रमाणे जो वेळ असतो तेवढा लागत असतो.

असं करा ऑनलाईन अप्लाय

पासपोर्टला अप्लाय करण्यासाठी (https://portal2.passportindia.gov.in/AppOnlineProject/user/RegistrationBaseAction) या साईटवर जा.

तुमच्याकडून ऑनलाईन पासपोर्टची फी घेतली जाईल.

Fresh Passport ची Normal Fees १५०० रुपये असणार आहे.

तर ६० पानांचं पासपोर्टसाठी २००० रुपये फी भरावी लागेल.

नॉर्मल पासपोर्ट यायला ३० दिवसांचा कालावधी लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com