
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात खळबळ उडाली असून त्याच दिवशी रात्री पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पूंछ जिल्ह्यातील टाटापाणी भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने अचानक गोळीबार सुरू केला. यामुळे भारत-पाक सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.